‘मी बेकसूर, माझी पॉलीग्राफ टेस्ट करा…’; कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणातील आरोपीचा यूटर्न
Kolkata Rape And Murder Case : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये (RG Kar Medical College) महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या संजय रॉयने (Sanjay Roy) यू-टर्न घेतला आहे. त्याची पॉलीग्राफ चाचणी करावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल, असे त्याच्या वकील कविता सरकार यांनी सांगितले.
… म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, वकिल सिद्धार्थ शिंदेंनी स्पष्टच सांगितले
मी निर्दोष असल्याचा दावा त्याने केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य करण्यासह तो तयार आहे, जेणेकरून खरा गुन्हेगार पकडता येईल, असंही वकिलांनी सांगितलं.
संजय रॉय याच्या वकील कविता सरकार यांनी सांगितले की, पॉलीग्राफ चाचणीसाठी संजयची संमती घेण्यात आली तेव्हा मी हजर होते. त्याने चाचणीसाठी संमती दिली होती. पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय हे देखील मी त्याला व्यक्तिशः समजावून सांगितले आहे. यानंतर त्याने होकार दिला. त्याच्यावर हे आरोप लावण्यात आल्यानेतो सध्या खूप मानसिक दबावाखाली आहे, सत्य बाहेर यावे असे त्याला वाटते.
महाराष्ट्र बंद काय करता? दुर्दैवी घटनेचे राजकारण करणं बंद करा; CM शिंदेंचा विरोधकांना टोला
आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. संजय रॉयने अटकेनंतर स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. अटकेनंतर पोलीस चौकशीत त्याची चौकशी केली असता ‘हो, मी गुन्हा केला आहे, मला फाशी द्या,’ असं तो म्हणाला होता. मात्र, आता त्याने यु टर्न घेतला. कविता सरकार यांच्या म्हणण्यानुसार, संजय रॉय या गुन्ह्यात आपला सहभाग नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे तो कोणत्याही चाचणीसाठी तयार आहे. या प्रकरणाच्या तपासात सर्व सहकार्य करेल,असंही सरकार यांनी सांगितलं.
संजय रॉयला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
संजय रॉय याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर संजय रॉय याला न्यायालयात हजर केले असता सियालदहच्या विशेष सीबीआय न्यायालयाने संजयला पुढील तपासासाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संजयला पॉर्न पाहण्याचे व्यसन
संजय रॉय याच्या मनोविश्लेषणात्मक व्यक्तिरेखेतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. तो विस्कळीत मानसिकतेचा माणूस होता. त्याला पॉर्नोग्राफीचे व्यसन होते, असं सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओही सापडल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं.