Dulal Sarkar : ममता बॅनर्जीच्या जवळच्या नेत्याला गोळ्या झाडून संपवलं…

Dulal Sarkar : ममता बॅनर्जीच्या जवळच्या नेत्याला गोळ्या झाडून संपवलं…

Dulal Sarkar : पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय दुलाल सरकार (Dulal Sarkar) यांच्यावर हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील झलझालिया मोर भागात दुचाकीस्वारांनी हा हल्ला केलायं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीयं.

नववर्षाची भक्तिमय सुरुवात! अभिनेता स्वप्नील जोशी तिरुपती बालाजी चरणी लीन

दुलाल सरकार यांची बबला म्हणून ओळख आहे. या घटनेचा व्हिडिओ पीटीआयकडून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओमध्ये दुलाल सरकार हे जीव वाचवण्यासाठी धावताना दिसून येत आहे. दुकानात बसलेले असताना काही लोकं त्यांच्याकडे आले.

‘मी पुन्हा येईन…’, छत्रपती संभाजीनगरात शिंदेसेनेच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य

दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात जवळून गोळ्या झाडल्याचं समोर आलं. या घटनेनंतर दुलाल यांना रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आलं, मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. माझे जवळचे सहकारी लोकप्रिय नेते बाबला सरकार यांची हत्या झाली असून त्यांनी पक्षासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. बाबला नगरसेवक म्हणून निवडून आले. मला या घटनेने धक्का बसला आहे. शोकाकुल कुटुंबाप्रती शोक कसा व्यक्त करावा हे समजत नाही. देव चैतालीला जगण्याची, लढण्याची शक्ती देवो, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलंय.

दरम्यान, दुलाल सरकार यांच्यावर गोळीबाराच्या घटनेमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांसाठी सुरक्षा वाढवण्याची गरज असून ममता यांच्या व्यतिरिक्त, टीएमसीचे सरचिटणीसस अभिषेक बॅनर्जी यांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube