नववर्षाची भक्तिमय सुरुवात! अभिनेता स्वप्नील जोशी तिरुपती बालाजी चरणी लीन

नववर्षाची भक्तिमय सुरुवात! अभिनेता स्वप्नील जोशी तिरुपती बालाजी चरणी लीन

Swapnil Joshi started new year by visiting Tirupati Balaji : निर्माता- अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) कायम चर्चेत असलेला अभिनेता आहे. तो कायम वैविध्यपूर्ण काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतो. 2025 हे वर्ष स्वप्नील साठी महत्त्वपूर्ण आहे आणि याला खूप कारण देखील आहेत. निर्माता अभिनेता स्वप्नील जोशीने नव्या वर्षाची भक्तिमय सुरुवात केलीय. स्वप्नील जोशीने काल तिरुपती बालाजीचं (Tirupati Balaji) दर्शन घेतलंय. गोविंदा असं कॅप्शन देत स्वप्निलने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

स्वप्नीलने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन 2025 वर्षाची भक्तिमय सुरुवात केली आहे. थॅंक यु रूपेश भाऊ, फॉर द इनक्रेडिबल दर्शन असं देखील स्वप्नीलने म्हटलंय. वर्षाची एवढी सुंदर सुरुवात करून त्याने त्याच्या २०२५ मध्ये कामाला सुरुवात केली (Swapnil Joshi Movie) आहे. या वर्षात स्वप्नीलचे अभिनेता आणि निर्माता म्हणून अनेक प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात 17 जानेवारीला जिलबी नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

भारतीय महिलांकडे जगात कुणाकडेच नाही इतकं सोनं; जाणून घ्या, कोणत्या देशात किती साठा?

पुढे स्वप्नील त्याची निर्मिती आणि अभिनय असलेला “सुशीला – सुजीत ” साठी सज्ज होत आहे, तर वर्ष संपताना स्वप्नीलने अजून एका चित्रपटाची घोषणा केलीय. चिकी चिकी बुबूम बुम हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Entertainment News) आहे. स्वप्नीलच्या कामाची यादी इथेच थांबत नाही, तर तो या वर्षात गुजराती सिनेमात देखील झळकणार आहे. एकंदरीत काय तर नवीन वर्ष स्वप्नीलसाठी चित्रपटमय ठरणार आहे.

ब्रेकिंग! अमेरिकेत 24 तासांत तिसरा मोठा हल्ला, न्यूयॉर्क क्लबमध्ये अंदाधूंद गोळीबार

अभिनेता म्हणून स्वप्नील जोशीच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलीय. निर्माता म्हणून स्वप्नील जोशीने 2024 वर्षात ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट या वर्षातला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला, सोबतीने बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल ठरला. जगभरात या चित्रपटाने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)

पुढे स्वप्नीलने बहुचर्चित ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन तर केलं, पण सोबतीने चित्रपटगृहात सगळ्यात जास्त दिवस हा चित्रपट देखील राहिला. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून त्याने आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube