भारतीय महिलांकडे जगात कुणाकडेच नाही इतकं सोनं; जाणून घ्या, कोणत्या देशात किती साठा?

भारतीय महिलांकडे जगात कुणाकडेच नाही इतकं सोनं; जाणून घ्या, कोणत्या देशात किती साठा?

Indian Women Gold Reserve : भारतात सोने या धातूला प्राचीन काळापासून महत्व आहे. सांस्कृतिक प्रतीक म्हणूनही सोन्याकडे (Gold) पाहिलं जातं. महिला वर्गात सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विवाह आणि अन्य समारंभात सोन्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढतं. हेच कारण आहे की भारतीय महिलांकडे सोन्याचा (Indian Women Gold Reserve) मोठा साठा झाला आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलनुसार भारतीय महिलांकडे एकूण 24 हजार टन सोने आहे. आभूषणांच्या रुपात जगातील एकूण सोन्याच्या 11 टक्के इतके हे सोने आहे.

जगातील आघाडीच्या पाच देशांकडील एकूण सोन्यापेक्षाही भारतीय महिलांकडे सोने जास्त आहे. तुलनाच करायची असेल तर आजमितीस अमेरिकेकडे 8 हजार टन, जर्मनी 3 हजार 300 टन, इटली 2 हजार 450 टन, फ्रान्स 2 हजार 400 टन आणि रशियाकडे 1 हजार 900 टन सोने आहे. या सर्व देशांमधील सोने एकत्र केले तरी भारतीय महिलांकडील सोन्यापेक्षा कमीच राहिल असे सांगण्यात येत आहे.

होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार!

ऑक्सफर्ड ग्रुपच्या एका रिपोर्टनुसार भारतीय कुटुंबाकडे जगातील एकूण सोने साठ्याच्या 11 टक्के हिस्सा आहे. अमेरिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, स्वित्झर्लंड, जर्मनीच्य संयुक्त सोने साठ्यापेक्षाही हा साठा जास्त आहे. सोन्याच्या मालकी हक्काच्या बाबतीत दक्षिण भारतीय महिला बऱ्याच पुढे आहेत. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्याच्या 40 टक्के सोने आहे. यामध्येही एकट्या तामिळनाडूमध्ये 28 टक्के सोने आहे.

वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या 2020-21 मधील अभ्यासातही असे संकेत मिळाले होते की भारतीय परिवारांकडे 21 हजार ते 23 हजार टन सोने आहे. 2023 पर्यंत यामध्ये आणखी वाढ होऊन हा आकडा 24 ते 25 हजार टनांपर्यंत पोहोचला. हा स्वर्ण भांडार देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचेही काम करतो.

रिझर्व्ह बँकेकडे किती सोनं?

भारतीय रिजर्व बँक मागील काही दिवसांपासून सोने खरेदी करत आहे. सध्या बँकेच्या एकूण परकीय गंगाजळीत सोन्याची हिस्सेदारी वाढून 10.2 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत देशाचा सोने साठा 876.18 टनांपर्यंत पोहोचला. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 डिसेंबर 2023 मध्ये देशाचा एकूण सोने साठा 803.58 टन होता.

दहा वर्षात देशाला काय-काय मिळालं? विमानतळ ते मेट्रो रेल्वेचा विस्तार , वाचा एका क्लिकवर

तामिळनाडूतील महिलांकडे सर्वाधिक सोनं

तज्ज्ञांच्या मते वाढत्या भू राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासारखे विकसनशील देश सोने साठ्यात वेगाने वाढ करत आहेत. यामुळे आर्थिक संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यात अडचणी निर्माण होणार नाहीत. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार तामिळनाडूतील महिलांकडे जगभरात सर्वाधिक सोने आहे. हे जवळपास 6 हजार 720 टन आहे. हा आकडा भारताच्या एकूण 28 टक्के इतका आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली, रशिया या देशांतील महिलांकडे सुद्धा इतके सोने नाही.

कोणत्या देशाकडे किती सोनं?

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की भारतीय आयकर कायद्यानुसार विवाहीत महिलांना 500 ग्रॅमपर्यंत सोने स्वतःकडे बाळगण्यास परवानगी आहे. अविवाहित महिलांनी ही परवानगी 250 ग्रॅम आहे. तसेच पुरुष स्वतःकडे 100 ग्रॅम सोने ठेऊ शकतात. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार अमेरिकेकडे 8 हजार टन, जर्मनीकडे 3 हजार 300 टन, इटलीकडे 2 हजार 450 टन, फ्रान्सकडे 2 हजार 400 टन आणि रशियाकडे 1 हजार 900 टन इतके सोने आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube