ब्रेकिंग! अमेरिकेत 24 तासांत तिसरा मोठा हल्ला, न्यूयॉर्क क्लबमध्ये अंदाधूंद गोळीबार

ब्रेकिंग! अमेरिकेत 24 तासांत तिसरा मोठा हल्ला, न्यूयॉर्क क्लबमध्ये अंदाधूंद गोळीबार

Third Major Attack In America In 24 Hours : अमेरिकेतून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आलीय. न्यूयॉर्क क्लबमध्ये अंदाधूंद गोळीबार झाल्याची माहिती (America News) मिळतेय. हा मागील 24 तासांतील अमेरिकेतली तिसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. ही घटना घडलेल्या नाईट क्लबचे नाव अमजोरा नाईट क्लब आहे. काल 1 जानेवारी रात्री 11.45 च्या सुमारास हा गोळीबार (Attack In America) झाला.

जमैका लाँग आयलँड रेल्वे रोड स्टेशनजवळील गोळीबाराच्या दृश्याला पोलीस विभागातील अनेक तुकड्यांनी प्रतिसाद दिला. ते क्षेत्र सुरक्षित करण्यासाठी आणि संशयितांना पकडण्यासाठी पोलीस विभागाने प्रयत्न (Firing In Queens Night Club In New York) केले. मात्र, संशयितांची ओळख पटली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडितांची प्रकृती अद्याप कळू शकलेली नाही. 24 तासांत अमेरिकेत तिसरा मोठा हल्ला झालाय. एका हल्लेखोराने न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथील नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक लोक जखमी झाले.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच एकत्र! ‘फसक्लास दाभाडे’मधील ‘दिस सरले’ गाणं प्रदर्शित

गेल्या 24 तासांत झालेल्या हल्ल्यांनी अमेरिका हादरली आहे. आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ( New York) नाईट क्लबमध्ये भीषण गोळीबार झाल्याची बातमी समोर आलीय. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण परिसर सील केला. याआधी काल 1 जानेवारी रोजी अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये 15 जणांचा मृ्त्यू झाल्याचं समजतंय.

“मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो”, काँग्रेस नेत्याचा दावा

दुसरा हल्ला अमेरिकेतील लास वेगास येथील ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर झाला. यामध्ये टेस्ला सायबर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले होते. यानंतर अमेरिकेतील होनोलुलु येथे झालेल्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. आता न्यूयॉर्कमध्ये घडलेली ही चौथी मोठी घटना आहे. ही गोळीबाराची घटना क्वीन्समधील अमेझुरा नाईट क्लबमध्ये घडली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube