मोठी बातमी! कोलकाता रेप प्रकरणातील आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मोठी बातमी! कोलकाता रेप प्रकरणातील  आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Kolkata Rape And Murder Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय (Sanjay Roy) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर संजय रॉय याला न्यायालयात हजर केले असता सियालदहच्या विशेष सीबीआय न्यायालयाने संजयला पुढील तपासासाठी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मोठी बातमी! कोलकाता रेप प्रकरणातील आरोपी संजय रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी 14 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजची प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. आज त्याला त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय रॉय हा 2019 पासून कोलकाता पोलिसांच्या आपत्ती व्यवस्थापन ग्रुपसोबत नागरी स्वयंसेवक म्हणून काम करतोय.

दरम्यान, संजयने पॉलीग्राफी चाचणी देण्याचं मान्य केलं. सीबीआयने त्याच्या पॉलिग्राफी चाचणीची मागणी लावून धरली होती.

संजयला पॉर्न पाहण्याचे व्यसन

बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याच्या मनोविश्लेषणात्मक व्यक्तिरेखेतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. तो विस्कळीत मानसिकतेचा माणूस होता. त्याला पॉर्नोग्राफीचे व्यसन होते, असं सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओही सापडले आहेत.

संजयला अटक कशी झाली?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय हा घटनेच्या दिवशी पहाटे 4 वाजताच्या सुमारास मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आपत्कालीन इमारतीत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यावेळी त्याच्या गळ्यात ब्लुट्यूथ डिव्हाईसदेखील आहे. त्यानंतर 40 मिनिटांनी तो बाहेर येताना दिसतो. तेव्हा त्याच्या गळ्यात ब्लूटूथ नसल्याचे दिसते. पोलिसांना पीडित डॉक्टरच्या मृतदेहाजवळ एक ब्लूटूथ उपकरण पडलेले आढळले. हे उपकरण आरोपी संजय रॉयच्या मोबाईलला कनेक्ट होते. त्यामुळं पोलिसांनी त्याला अटक केली होती.

संजय रॉय याने कोलकाता पोलिसांना सांगितले होते की, गुन्ह्याच्या एक दिवस आधी 8 ऑगस्ट रोजी त्याने पीडितेचा वॉर्डात पाठलाग केला होता.

Ananya Panday: अनन्या पांडेचा ग्लॅमरस अंदाज 

डॉक्टरांचा संप सुरूच…
दरम्यान, या महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्लीतील विविध रुग्णालयांतील डॉक्टरांनी सुरू केलेला संप मागे घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने अपील केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने संप मागे घेण्याचे आवाहन करूनही ज्युनियर डॉक्टर्स फ्रंट ऑफ बंगालने आंदोलन मागे घेतला नाही.

काय म्हणाले आंदोलक डॉक्टर?
आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एका आंदोलक डॉक्टरांनी सांगितले. कारण आमच्या बहिणीला न्याय मिळावा ही मुख्य मागणी अजूनही प्रलंबित असल्याचं आंदोलक डॉक्टरने सांगितलं.

काय म्हणाले आंदोलक डॉक्टर?
आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एका आंदोलक डॉक्टरांनी सांगितले. कारण आमच्या बहिणीला न्याय मिळावा ही मुख्य मागणी अजूनही प्रलंबित असल्याचं आंदोलक डॉक्टरने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube