पश्चिम बंगाल पुन्हा हादरल! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन पेटवलं

पश्चिम बंगाल पुन्हा हादरल! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन पेटवलं

Kolkata South-24 Pargana Rape Case : पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेनंतर पेटलेला आंदोलनाचा वणवा शांत होत नाही तोच येथील दक्षिण-२४ परगणा जिल्ह्यामध्ये एका दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. (Kolkata) या घटनेनंतर स्थानिकांनी आंदोलन करत पोलीस ठाण्यालाच आग लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

आज सकाळी मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांनी आंदोलन सुरू केले. संतप्त जमावाने माहिष्मरी पोलीस ठाण्याला आग लावत तुफान दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. पोलीस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची देखील जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे

अमरावतीत वातावरण चिघळलं; जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक, 21 पोलीस झाले जखमी

जमाव नियंत्रणात येत नसल्याचं पाहून पोलिसांना घटनास्थळावरून पळ काढावा लागल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या सगळ्या राड्यामध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येतं.

पीडित मुलीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली होती पण पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यावर तातडीने कारवाई न केल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितलं. ज्या पद्धतीने आर जी कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचाराची घटना दाबण्याचा प्रकार घडला तसाच काहीसा प्रकार येथेही घडल्याचं स्थानिक सांगत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube