मोदी-योगींचे कौतुक पडले महागात, संतापलेल्या पतीने मारहाण करत दिला तिहेरी तलाक

मोदी-योगींचे कौतुक पडले महागात, संतापलेल्या पतीने मारहाण करत दिला तिहेरी तलाक

Ayodhya Triple Talaq : एका मुस्लिम महिलेने तिच्या पती समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे कौतुक केल्याने पतीकडून तिला जाळण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यानंतर तिला तिहेरी तलाक (Triple Talaq) दिला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. सध्या या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

पीडित महिलेने या प्रकरणात अयोध्या (Ayodhya) आणि बहराइच (Bahraich) पोलिसांना कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

पीडित महिलेचे म्हणणे आहे की, पती समोर अयोध्येचा विकास पाहून मोदी-योगींचे कौतुक केल्याने पतीने मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिले आणि त्यानंतर तिला तिहेरी तलाक दिला. माहितीनुसार, पीडित महिला मोहल्ला सराय पोलिस स्टेशन, जारवाल रोड, बहराइच जिल्ह्यातील रहिवासी असून 13 डिसेंबर 2023 रोजी तिचा लग्न अयोध्या कोतवाली नगर अंतर्गत मोहल्ला दिल्ली दरवाजा येथे राहणारा अर्शदशी झाला होता.

पीडित महिला म्हणाली की, जेव्हा ती पतीसोबत अयोध्येला गेली होती तेव्हा लता चौकातील रस्त्याचे सौंदर्य आणि विकासकामे पाहून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले मात्र पतीला हे आवडले नाही आणि त्याने मला माहेरच्या घरी पाठवले.

… म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, वकिल सिद्धार्थ शिंदेंनी स्पष्टच सांगितले

मात्र काही दिवसानंतर पुन्हा सासरच्या घरी आली तेव्हा त्याने तिहेरी तलाक देऊन मारहाण केली आणि सासूच्या सांगण्यावरून त्याने किचनमधून चुलीवर ठेवलेली गरम डाळ आणून माझ्या तोंडावर फेकली त्यामुळे माझा चेहरा भाजला. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी आता पीडित महिला करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube