Download App

राहुल गांधींनी उल्लेख केलेली मुस्लिम ब्रदरहुड आहे तरी काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत राहिलेले कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहे. राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमध्ये भाष्य करत असताना त्यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली. आरएसएसमुळे भारतातील लोकशाहीचे स्वरूप बदलले असल्याची टीका राहुल यांनी केली. तसेच संघ ही एक कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना आहे. राहुल यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहुडशी केली. नेमकं राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली मुस्लिम ब्रदरहुड आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊ

राहुल गांधी नेमकं म्हंटले तरी काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या एका भाषणाद्वारे भाजपला तसेच आरएसएसला टार्गेट केले. यावेळी त्यांनी टीका करताना आरएसएसची तुलना थेट मुस्लिम ब्रदरहुडशी केली. ते म्हणाले की लोकशाही स्पर्धेद्वारे सत्तेत येणे आणि नंतर ही लोकशाही स्पर्धा संपविणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.

मुस्लिम ब्रदरहुड म्हणजे काय?
मुस्लिम ब्रदरहुड ही इजिप्तमधील सर्वात जुनी इस्लामिक संस्था असून तिची स्थापना 1928 मध्ये झाली आहे. या संस्थेची स्थापना हसन-अल-बन्नाने केली होती. संस्था स्थापन केल्यानंतर, मुस्लिम ब्रदरहुडच्या शाखा हळूहळू जगभर पसरण्यास सुरवात झाली. ही एक मूलगामी इस्लामिक संस्था आहे.

इस्लामिक कायद्याच्या आधारे म्हणजेच शरियाच्या आधारे काम करणे असे या संस्थेचे नियम आहे. अरब देशांमध्ये सक्रिय असलेल्या या संस्थेवरही दहशतवादाला चालना देण्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर अल कायदा हा मुस्लिम ब्रदरहूड या संस्थेचा दहशतवादी चेहरा मानला जातो. अल कायदा दहशतवादी संघटनेचा माजी प्रमुख ओसामा बिन लादेन हा पहिला मुस्लिम ब्रदरहुड संघटनेचा सदस्य होता.

भारताला मोठा धक्का, कसोटी पाठोपाठ ‘हा’ खेळाडू एकदिवसीय सामन्यातून झाला बाहेर

ही संघटना स्थापन झाल्यापासून संघटेनच्या शाखा देशभरात पसरल्या आहेत. 1928 च्या शेवटच्या दशकात त्यांची संख्या 20 लाखांपर्यंत होती. या संघटनेच्या शाखा इजिप्तमध्ये वेगाने वाढू लागल्या. या संस्थेची विचारसरणी केवळ इजिप्तपुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण अरब देशांमध्येही पसरली. मुस्लिम ब्रदरहुडची प्रसिद्ध घोषणा “इस्लाम हा उपाय आहे अशी आहे.

तुम्ही जनतेच्या भल्यासाठी काय केलं? विखेंचा बाळासाहेब थोरातांना सवाल

दहशतवादी संघटना म्हणून घोषित
इजिप्त, सीरिया, सौदी अरेबिया, रशिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये या संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. 1954 मध्ये या संघटनेवर राष्ट्रपती गमाल अब्देल नासर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. जरी इजिप्तमध्ये या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले असले तरी, संयुक्त अरब अमिराती, रशिया, सीरिया… आदी देशांच्या राजकारणात ही संघटना सक्रियपणे कार्यरत आहे.

Tags

follow us