Jensen Huang : अफेयर कांडात Nvidia चे बॉस फसताच ड्रॅगनची झोप उडाली…

Jensen Huang हुआंग यांच्याभोवती वादळ, चीनची झोप उडाली! Nvidia च्या एका निर्णयाने चीनची AI स्वप्नं धोक्यात येणार?

Jensen Huang

Jensen Huang

Why China Has the Most to Lose From Jensen Huangs Exit : एका बाजूला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या महायुद्धात संपूर्ण जग जिंकण्याची स्वप्नं पाहणारा टेक बादशाह… आणि दुसऱ्या बाजूला, एका खळबळजनक ‘अफेयर कांड’ आणि जासूसीच्या चक्रव्युहात अडकलेला त्याचा मुख्य कॅप्टन! होय, Nvidia चे सीईओ जेनसन हुआंग आज एका मोठ्या पर्सनल आणि प्रोफेशनल वादात अडकले आहेत… आणि या एकाच भूकंपासोबत… जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा हादरा बसलाय तो ‘ड्रॅगन’ म्हणजेच चीनला.

Nvidia CEO Jensen Huang : भारतीय महिला ठरवणार हुआंग यांचे भवितव्य, आरती शाह कोण ?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एका कंपनीच्या बॉसच्या आयुष्यात चाललेल्या या वादळाचा चीनशी काय संबंध? पण याचा संबंध थेट आणि खूप मोठा आहे. कारण आज जगात जेवढी म्हणून ताकदवान AI मॉडेल्स तयार होत आहेत, त्या सर्वांच्या मुळाशी आहे ते Nvidia चे शक्तिशाली GPU चिप्स.

Nvidia CEO Divorce : अब्जाधीशांचा संसार मोडला तर, किती मोजावी लागते किंमत? वाचा चर्चेतले Divorce

अलिबाबा असो वा बाइटडान्स… चीनच्या प्रत्येक टेक जायंटला आपली AI ची गाडी सुसाट पळवण्यासाठी याच चिप्सची नितांत गरज आहे. अमेरिकेने जरी चीनवर कितीही कडक निर्बंध लादले असले, तरी म्हणतात ना… ‘चोर तो चोर, वरून शिरजोर’ तसाच काहीसा प्रकार ड्रॅगननं केला. चीनच्या कंपन्यांनी सिंगापूरसारख्या देशांमार्फत 7.5 अब्ज डॉलर्सच्या Nvidia चिप्सचे छुपे मार्ग शोधले आणि अमेरिकेची डोळेफेक करून हा माल थेट ड्रॅगनच्या पोटात पोहोचवला. पण म्हणतात ना, केलेली पापं कधीच लपून राहत नाही आणि झालंही तसंच, जेन्सन हुआंग यांच्याशी जोडलं गेलेलं हे कथित अफेयर कांड आणि गुप्त व्यवहारांचे बिंग फुटलं अन् अमेरिकन संसद आणि सुरक्षा यंत्रणांचे डोळे खाडकन उघडले. Why China Has the Most to Lose From Jensen Huangs Exit

सिंगापूरच्या ‘Megaspeed International’ कंपनीच्या माध्यमातून झालेला हा सगळा काळा बाजार आता चव्हाट्यावर आला असून, जरी संबंधित पक्षांनी हे आरोप फेटाळले असले, तरी आता अमेरिकेचे खासदार आणि अधिकारी अधिक आक्रमक होत चीनपर्यंत चिप्स पोहोचवणारे हे सगळे ‘बॅकडोअर’ मार्ग आता कायमचे सील केले पाहिजे असा थेट शड्डू ठोकलाय आणि याच घडामोडींमुळे चीनच्या पायाखालची जमीन सरकलीये.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

चीनकडे स्वतःची ‘Huawei’ सारखी कंपनी आहे खरी… पण देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी जेवढे अद्ययावत चिप्स हवेत, त्यांचे उत्पादन अजूनही तोकडं पडतंय. वरून, जेनसन हुआंग हे नेहमीच ‘ओपन-सोर्स AI’ मॉडेलचे खंदे समर्थक राहिले आहेत; ज्याचा फायदा चीनच्या कंपन्या जगताशी टक्कर देण्यासाठी घेत होत्या. पण आता अमेरिकेने जर हा पाश आणखी आवळला, तर चीनच्या त्या भव्य ‘AI’ स्वप्नांना मोठा ब्रेक लागलाच म्हणून समजा. त्यामुळे ड्रॅगनसमोर आता दोन महाकाय डोंगर उभे ठाकले आहेत. पहिला डोंगर म्हणजे अमेरिकन तंत्रज्ञानावरील ही जुनी गुलामी आणि निर्भरता कशी संपवायची? आणि दुसरा म्हणजे समोर उभ्या
ठाकलेल्या वादळाच्या तडाख्यात आपल्या AI इंडस्ट्रीचा वेग कसा टिकवून ठेवायचा ते.

अफेअर कांडमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरलेला हुआंग यांचा हा खेळ फक्त एका सीईओच्या खुर्चीचा किंवा एका वैयक्तिक वादाचा राहिला नाहीये… तर, हा खेळ आहे येत्या काळात संपूर्ण जगावर कोण राज्य करणार याचा झाला आहे. Nvidia वर आलेलं हे संकट अमेरिकापुरतं मर्यादित नसून, ते चीनच्या भविष्याची आणि सामर्थ्याची दिशा ठरवणारं असणारेय त्यामुळे आता या महायुद्धात ड्रॅगन स्वतःचा नवा मार्ग शोधून काढतो… की या रेसमध्ये कायमचा मागं पडतो? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Exit mobile version