Iran Israel Conflict : गेल्या पाच दिवसांपासून इस्त्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरु असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यात येत आहे. या युद्धात अमेरिकेने इस्त्रायलची बाजू घेत इराणवर हल्ला केल्याने इराणने अमेरिकेचा समर्थन करणारे अरब देशांवर हल्ले करत अमेरिकेला इशारा दिला आहे. यानंतर इस्त्रायलकडून लेबनॉनमधील तेहरानच्या मिशनवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. तर आता इराणने इस्त्रायलला धमकी दिली आहे. जर इस्रायलने लेबनॉनमधील तेहरानच्या मिशनवर हल्ला केला तर ते जगभरातील इस्रायली राजनैतिक मिशनला टार्गेट करणार असं इराणी सशस्त्र दलाचे प्रवक्ते अबोलफझल शेखार यांनी म्हटले आहे.
इराणी सशस्त्र दलाचे प्रवक्ते अबोलफझल शेखारची (Iran Israel Conflict) यांनी सरकारी टेलिव्हिजनवर सांगितले की, इस्रायलच्या अशा कोणत्याही कृतीमुळे इराणला जगभरातील इस्रायली दूतावासांवर हल्ला करण्यास भाग पाडले जाईल. इस्रायलने लेबनॉनमध्ये असलेल्या इराणी दहशतवादी राजवटीच्या प्रतिनिधींना टार्गेट करण्यापूर्वी निघून जाण्याचा इशारा इस्रायली (Israel) लष्कराचे प्रवक्ते अवीचाई अद्राई यांनी दिला होता. तर आता याला प्रत्युत्तर देत जगभरातील इस्रायली दूतावासांना उडवून देणार असल्याची धमकी इराणकडून देण्यात आली आहे.
राज्यात बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो ठप्प! ई-चलन विरोधात वाहतूकदार संघटना आज संपावर-
100 हून अधिक अमेरिकन मरीन उद्ध्वस्त
इराणच्या खातम अल-अंबिया सेंट्रल मुख्यालयाने सांगितले की, दुबईतील अमेरिकन लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यात 100 हून अधिक अमेरिकन मरीन उद्ध्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे अमेरिका, इस्त्रायल आणि इराण दरम्यान सुरु असणाऱ्या या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर हल्ला करत या युद्धाची सुरुवात केली होती. यानंतर इराणकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराण इस्त्रायलसह अरब देशांवर हल्ले करत असल्याची माहिती समोर आली आहे.
