मोठी बातमी! हमास लष्कर प्रमुख ओसामा तबाश ठार? इस्रायली सैन्याचा दावा

मोठी बातमी! हमास लष्कर प्रमुख ओसामा तबाश ठार? इस्रायली सैन्याचा दावा

Hamas Military Chief Killed :  पुन्हा एकदा इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्धाची (Israel – Hamas War) सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलकडून गाजामध्ये जोरदार हवाई हल्ले करण्यात येत आहे. माहितीनुसार, या हल्ल्यात 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे. तर आता पुन्हा एकदा या युद्धासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

शुक्रवारी इस्त्रायली सैन्याने मोठा दावा करत हमासच्या लष्करी प्रमुख ओसामा तबाशला (Osama Tabash) ठार मारला असल्याचा दावा केला आहे. मात्र यावर आतापर्यंत हमासकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

तर दुसरीकडे इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या हवाई दलाने गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलच्या अश्केलोन (Ashkelon) शहराकडे डागलेले दोन रॉकेट पाडले. कोणत्याही जीवितहानी झाली नाही अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे. तर इस्रायलच्या चॅनल 12 न्यूजनुसार, रहिवाशांनी मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकल्याचे सांगितले, काही लोक रस्त्याच्या कडेला त्यांची वाहने थांबवून जमिनीवर तोंड टेकवताना दिसले.

LIC ची जबरदस्त योजना, दरमहा मिळणार पेन्शन, जाणून घ्या गुंतवणुकीबद्दल सर्वकाही

हमासच्या अल-कसम ब्रिगेड्सने रॉकेट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि इस्रायलने केलेल्या “नागरिकांवरील नरसंहाराचा” बदला म्हणून हे वर्णन केले. पुन्हा एकदा 19 जानेवारीपासून सुरू झालेला हमाससोबतचा युद्धविराम करार अयशस्वी झाल्यानंतर इस्रायलने मंगळवारी गाझामध्ये पुन्हा हल्ले सुरू केले. त्यानंतर इस्रायली सैन्याने दक्षिण, उत्तर आणि मध्य गाझामध्ये जमिनीवर कारवाई सुरू केली. हमास संचालित गाझा मीडिया ऑफिसनुसार, गाझामध्ये पुन्हा इस्रायली हल्ल्यांमध्ये मृतांची संख्या 590 हून अधिक झाली आहे, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या