Wendy Rush Titanic : अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटन पाणबुडीचा शोध घेतला जात असला तरी ती मिळून येईल याची शक्यता धूसर होत चालली आहे. ही पाणबुडी 1912 मध्ये बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखविण्यासाठी पर्यटकांना घेऊन चालली होती. आता याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. या पाणबुडी चालविणाऱ्या कंपनीचा मालक आणि बुडालेल्या टायटॅनिकचे कनेक्शन आहे. 1997 मध्ये आलेल्या टायटॅनिक या चित्रपटात या संदर्भात एक सीनही दाखविण्यात आला होता. ही पाणबुडी रविवारी अटलांटिक महासागरात बुडाली होती. आता तर काही तासांतच या पाणबुडीतील ऑक्सिजनही संपणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमेरिकेतील ओशिनगेट कंपनी ही पाणुबडी चालवते. या कंपनीची सुरुवात स्टोकटन रश यांनी 2009 मध्ये केली होती. स्टोकटनची पत्नी वेंडीचे आजी आजोबा हे या टायटॅनिक जहाजातील प्रवासी होते. वेंडीचे आजोबा एका डिपार्टमेंटल स्टोअरचे मालक होते. मागील दोन वर्षात वेंडी टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी आली होती. ती कंपनीची कम्युनिकेशन डायरेक्टर आहे. तिचे पती स्टोकटन पाणबुडी चालवतात.
माहितीनुसार, वेंडीचे आजोबा स्ट्रॉस यांनी बोटीत बसण्यास नकार दिला होता. ज्यावेळी प्रवाशांना वाचविण्याचे काम सुरू होते त्यावेळी त्यांनी जागा सोडली. त्यानंतर त्यांच्या पत्नीनेही पतीची साथ सोडण्यास नकार दिला. यानंतर दोघांचाही मृत्यू झाला. स्टोकटन रश यांनी कधीही सुरक्षेला प्रोत्साहन दिले नाही. सुरक्षा म्हणजे वेळेचा अपव्यय असेच त्यांचे मत होते. जर तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर कारमध्ये बसू नका, काहीच करू नका असे त्यांनी एकदा म्हटले होते.