China Pneumonia Update : कोरोना आता जगातून हद्दपार झाला आहे. मात्र या घातक आजाराची सुरुवात जिथून झाली आणि हा आजार जगभरात पसरला त्याच चीनमध्ये आता नवा आजार धुमाकूळ घालू लागला आहे. या आजाराची (China Pneumonia) साथ इतकी वाढली आहे की आता काही शहरांतील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) या आजाराची दखल घेतली असून अहवाल मागितला आहे. या रहस्यमयी आजाराची लागण लहान मुलांना मोठ्या प्रमाणात झाली आहे. येथील शाळांमध्ये न्यूमोनिया वेगाने पसरत चालला आहे. त्यामुळे अनेक शहरांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
आठवड्यात 70 तास..; चीन-जपानला टेक ओव्हर करण्यासाठी नारायण मूर्तींनी सांगितला फॉर्म्युला
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार या आजाराचा फैलाव शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. न्यूमोनिया बाधित मुलांमध्ये फुफ्फुसात सूज येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसत आहेत. विशेष म्हणजे, खोकला, श्वसन विकारांशी संबंधित अन्य लक्षणे या मुलांमध्ये दिसत नाहीत हे विशेष आहे. हा आजार पसरत चालल्याचे कारण म्हणजे कोविड 19 निर्बंध शिथील करणे आहे असा ठपका जागतिक आरोग्य संघटनेने ठेवला आहे. संघटनेने आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएन्झा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया संबंधी अतिरिक्त माहिती मागवली आहे. चीनमध्ये आजारी पडण्याच्या अलीकडील घटनांमध्ये कोविडसारखीच लक्षणे पुन्हा दिसत आहेत.
हा उद्रेक नेमका कसा सुरू झाला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. इतक्या मुलांवर परिणाम होणे ही साधी गोष्ट नाही, असे ओपन एक्सेस सर्व्हिलांस प्लॅटफॉर्म प्रोमेडने म्हटले आहे. हा आजार एक महामारी आहे की नाही याचा अंदाज आताच देणे घाईचे ठरेल. तरीही या काळात काळजी घेणे जास्त गरजेचे आहे. या नव्या उद्रेकामुळे अनेक मुले आजारी पडली आहेत अशी माहिती तैवानच्या आउटलेट एफटीव्ही न्यूजने दिली आहे.
चीनची रेलगन सुसज्ज आण्विक विमानवाहू नौका सज्ज, हिंदी महासागरात भारताला थेट धोका
या आजाराची नवी कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, सतत ताप येत आहे आणि फुफ्फुसात गाठी तयार होत आहेत. लहान मुलांच्या उपचारासाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे. रुग्णांचा रांगा लागल्या आहेत. आजारांवर लक्ष ठेऊन त्यांचं विश्लेषण करणारी वेबसाइट प्रोमेड मेल अलर्टमध्ये एका मेडिकल स्टाफच्या हवाल्याने सांगितले आहे की रुग्णांनी दोन तास वाट पहावी लागत आहे. दवाखान्यात खाटाही शिल्लक राहिलेल्या नाहीत.