चीनची रेलगन सुसज्ज आण्विक विमानवाहू नौका सज्ज, हिंदी महासागरात भारताला थेट धोका
बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चीन आधीच त्रस्त आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चीनने विमानवाहू जहाज (aircraft carrier) तयार केलं आहे. चीनने रेलगनने सुसज्ज अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजाचे अनावरण केले आहे. ही युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार आहे. रेलगनसह सशस्त्र विमानवाहू वाहक ही संकल्पना सोव्हिएत युनियनची (Soviet Union) आहे, जी आता चीनने पुनरुज्जीवित केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या युद्धनौकांपेक्षा हे अधिक शक्तिशाली शस्त्र असू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
चीनची पहिली विमानवाहू युद्धनौका सोव्हिएत काळातील आहे. तर आताची विमानवाहू नौका पूर्वीच्या युद्धनौकेपेक्षा अधिक आधुनिक आहे. या रेलगनमुळे हिंदी महासागरात भारताला थेट धोका निर्माण होऊ शकतो. अणुऊर्जेवर चालणार्या विमानवाहू वाहकावर बसवण्यात आल्याने चीन संपूर्ण जगात हव्या त्या ठिकाणी ते तैनात करू शकतो. या महिन्यात, साउथ चायना मॉर्निंग पोस्टने वृत्त दिले की, मा वेमिंग (एक सर्वोच्च चिनी नौदल शास्त्रज्ञ) यांनी भविष्यकालीन युद्धनौका प्रस्तावित केली. जी नौदल ताफ्याला स्टार वॉर्स-शैलीतील सुपर-शिपमध्ये बदलू शकेल. मा यांनी त्यांची रचना चायना इलेक्ट्रोटेक्निकल सोसायटीच्या पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नल ट्रान्झॅक्शन्समध्ये मांडली.
Sharad Pawar : ‘ते’ फोटो सोशल मीडियावर का वापराले? शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही चीनी सुपरशिप अनेक विमाने वाहून नेऊ शकते. परंतु, हे कोणत्याही पारंपरिक विमानवाहू जहाजापेक्षा वेगळे आहे, कारण ते रेलगन, कॉइलगन, रॉकेट लाँचर, लेझर शस्त्रे आणि मायक्रोवेव्हसारख्या उच्च शक्तीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सने सुसज्ज आहे. वृत्तपत्राने स्त्रोताच्या हवाल्याने म्हटले आहे की या चिनी जहाजामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिस्टम बसवण्यात आली. याच्या मदतीने ही युद्धनौका हवाई हल्ल्यांपासून अचूक संरक्षण देऊ शकते आणि पाणबुडीविरोधी युद्धात वापरता येऊ शकते. याशिवाय क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता आणि समुद्रात किंवा जमिनीवरील लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमताही यात आहे.
कॉइलगन धोकादायक का आहे?
कॉइल गनला गॉस गन म्हणूनही ओळखले जाते. चिनी नौदल शास्त्रज्ञांनी कॉइल गनची नेमकी वैशिष्ट्ये उघड केलेली नाहीत किंवा ती कधी कार्यान्वित केली जाईल हे सांगितले नाही. त्याने एवढेच सांगितले की, अशा बंदुकीतून डागलेले प्रक्षेपण अनेक किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. प्रकल्पाशी निगडित लोकांच्या म्हणण्यानुसार, कॉइलगनने पहिल्या गोळीबार चाचणीत 0.05 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 124 किलो वजनाचा शेल ताशी 700 किलोमीटर वेगाने उडवला.
चीनची सुपर शिप कॅरिअर ही सोव्हिएत काळातील एव्हिएशन क्रूझर संकल्पनेची आधुनिक आवृत्ती आहे. एव्हिएशन क्रूझर हे एक जहाज आहे जे विमानवाहू आणि क्रूझरच्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.