France Violence : पोलिसाच्या गोळीबारात मुलगा ठार झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (France Violence) उसळलेला हिंसाचार आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सध्या हिंसाचाराच आगडोंब उसळला आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जात असून वाहनांना आगी लावण्यात येत आहेत. इतकेच नाही त सार्वजनिक इमारती आणि पोलिसांनाही टार्गेट केले जात आहे. देशातील या हिंसाचारामुळे फ्रान्स सरकार हादरले असून राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रों यांनी दुसऱ्यांदा तातडीची बैठक बोलावली आहे.
फ्रान्समध्ये आणीबाणीची परिस्थिती! राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक
या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सोशल मीडियावर प्रतिबंध टाकण्याचा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. सोशल मीडियामुळेच दंगली वेगाने भडकल्या आहेत. आता परिस्थिती इतकी चिघळली आहे की लहान मुलांना घराबाहेर सोडू नये असे आदेश देण्यात आले आहेत. आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 200 पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 900 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांनी इमारतींना टार्गेट केले. संतप्त आंदोलकांनी रस्त्यांवरील वाहने पेटवून दिली. दुचाकी वाहनांनाही सोडले नाही.
फ्रान्समध्ये नेमकं काय घडलं होतं ?
पॅरिसमधील नानतेरे भागात वाहतूक नियमांचे पालन केले नाही म्हणून एका पोलीस कर्मचाऱ्याने अश्वेत डिलीव्हरी करणाऱ्या मुलावर गोळी झाडली. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या मुलाने वाहतूक नियम मोडले असा दावा पोलिसांनी केला तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की त्याच्याकडे लायसन नव्हते. या घटनेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्यानंतर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र तोपर्यंत ही बातमी देशभरात पसरली आणि जाळपोळीच्या घटना सुरू झाल्या. जगभरातील देशांनी पॅरिस पोलिसांच्या या कृत्यावर जोरदार टीका केली.
Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’चे कौतुक
कोण होता नाहेल एम
नाहेल एम हा अल्जेरियन वंशाचा फ्रेंच निर्वासित होता. तो टेकवे डिलिव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि रग्बी लीग खेळत होता. तो त्याच्या आईसोबत राहत होता. नहेलच्या वडिलांची माहिती नाही. सध्या नाहेलने इलेक्ट्रिशियन बनण्याचे प्रशिक्षण घेत होता. त्यासाठी सुरेसनेस येथील महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता. त्याचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता.
2017 चा कायदा ठरतोय कारण
खरं तर फ्रान्समध्ये अशा ज्या घटना घडत आहेत त्यामागे 2017 मधील रोफ्यू दोब्तोंपेरे नावाचा एक कायदा आहे. या कायद्यानुसार एखाद्या वाहतूक नियम मोडल्यानंतर जर पोलिसांना असे वाटले की वाहनचालकाने हे काम कुणाच्या जीवाला नुकसान पोहोचविण्यासाठी किंवा सार्वजनिक ठिकाणी हल्ला करण्यासाठी केले आहे तर अशा व्यक्तीला गोळी मारण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.