Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धात एक महत्वाची (Russia Ukraine War) घडामोड घडली आहे. सुरक्षा कारणांचा हवाला देत रशियाने पारंपारिक (Russia) नेवी परेड रद्द केली आहे. ही परेड रशियन नौसेना दिनाचे मुख्य आकर्षण होती. ही परेड दरवर्षी जुलै महिन्यातील शेवटच्या रविवारी आयोजित केली जाते. रशियाचे राष्ट्रपतींचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी सांगितले की हा निर्णय सध्याची परिस्थिती आणि सुरक्षिततेचा विचार करुन घेतला गेला आहे. देशाची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे असेही त्यांनी सांगितले.
न्यूज एजन्सी एसोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले की रशियाच्या वायूदलाने रात्रभर अनेक ठिकाणी तब्बल 99 युक्रेनी ड्रोन नष्ट केले. सेंट पीटर्सबर्गच्या पुल्कोवो विमानतळाने रविवारी 40 उड्डाणे रद्द केली. युक्रेनकडून सातत्याने होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियात हालचाली वाढल्या आहेत. नौसेना दिवसाचा समारोह मर्यादीत करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. स्थानिक प्रशासनाने परेड रद्द झाल्याची माहिती एक दिवस आधीच दिली होती. परंतु, त्यावेळी कोणतेही अधिकृत कारण दिलेले नव्हते. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार शनिवारी सकाळी युक्रेनचे 200 ड्रोन नष्ट करण्यात आले होते.
Russia China : चीन-रशियाकडून डॉलर हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन
रशियाने याआधीही परेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मागील वर्षी क्रोनस्टॅड पोर्ट येथे होणारी परेड रद्द करण्यात आली होती. परंतु,सेंट पीटर्सबर्गमध्ये मात्र शो झाला होता. रिपोर्टमध्ये दावा केला आहे की युक्रेनच्या हल्ल्यांची शक्यता आणि अमेरिकेने दिलेला इशारा यांचा विचार करून नेवी परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी एका व्हिडीओ संदेशात नेवी दिनी नौसेनेच्या शौर्याचं कौतुक केलं.