Download App

काहीतरी घडणार! B2 बॉम्बर अमेरिकेतून झेपावले, इराणच्या न्यूक्लिअर साइट टार्गेट?

इराणच्या सर्वात सुरक्षित अशा फोर्डो आण्विक ठिकाणांवर या विमानांद्वारे हल्ला केला जाऊ शकतो अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Israel Iran War Latest : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध धोकादायक पातळीवर (Israel Iran War) पोहोचलं आहे. दोन्हीही देश एकमेकांवर तुफान हल्ले करत आहेत. कुणीही माघार घेण्याच्या मानसिकतेत नाही. या यु्द्धाकडे जगाचं लक्ष लागलं आहे. यातच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे सर्वात विनाशक असे B-2 स्टेल्थ बॉम्बर्सने अचानक झेप घेतली आहे. फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या चर्चेनुसार मिसुरी स्थित व्हाईटमॅन एअरफोर्स बेसवरून उड्डाण घेतल्यानंतर आता हे बॉम्बर्स गुआम येथील अमेरिकी बेसकडे निघाले आहेत. दरम्यान, इराणच्या सर्वात सुरक्षित अशा फोर्डो (FORDO) आण्विक ठिकाणांवर या विमानांद्वारे हल्ला केला जाऊ शकतो अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीने चीन आणि रशियाची अस्वस्थता वाढली आहे. या स्टेल्थ बॉम्बर्सने अर्ध्या रस्त्यात असतानाच रिफ्यूलिंग केले. यातून असे लक्षात येते की उड्डाणाच्या वेळी पू्र्ण इंधन भरले गेले नव्हते. यामागेही कारण आहे. या विमानात दोन टन वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब फिट केलेले असतात. चर्चा अशी आहे की हे हत्यार फक्त अमेरिकेकडेच आहे. पृथ्वीच्या आत असणाऱ्या ठिकाणांना उद्ध्वस्त करणे हेच या हत्याराचे उद्दीष्ट आहे.

इस्त्रायलचा सर्वात मोठा सायबर हल्ला, इराणचे 800 कोटी रुपयांचे क्रिप्टो ‘बर्न’

बंकर बस्टर बॉम्ब म्हणजे काय

JINSA चे फॉरेन पॉलिसी डायरेक्टर जोनाथन रुहेने फॉक्स न्यूजशी संवाद साधताना सांगितले की हे बॉम्ब गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने खालच्या बाजूने पडतात. माती, सिमेंट आण दगडांचे थर पार करत थेट टार्गेटवर आघात करतात. येथे बॉम्ब जमिनीच्या आत फुटतो. यामुळे टार्गेट पूर्णपणे उद्धवस्त होते किंवा आसपासच्या परिसरातील इमारती कोसळतात. फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीजचे सीईओ मार्क डुबोविट्ज यांच्यानुसार इराणचा फोर्डो न्यू्क्लिअर प्लँट इतका मजबूत आहे की त्याला फक्त अमेरिकाचे हवेतून टार्गेट करू शकते. अन्य कोणत्याही देशाची अशी क्षमता नाही आणि त्यांच्याकडे तशी शस्त्रास्त्रेही नाहीत. आजमितीस इस्त्रायलला (Israel News) या बंकर बस्टर बॉम्बची अत्यंत गरज आहे.

या घडामोडींवर अद्याप अमेरिकेकडून कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. परंतु, डिफेन्स एक्सपर्ट्स या प्रकाराला सायकोलॉजिकल सिग्नलिंग म्हणून पाहत आहेत. म्हणजेच अमेरिका पूर्णपणे तयार आहे असा संदेश शत्रूला देणे. या घडामोडींवरुन अमेरिका असा संदेश इराणला (Iran News) देण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे.

China : खोटं बोललात तर अकाउंट बंद! चीनच्या जिनपिंग सरकारचा कठोर नियम; काय होणार?

..तर आम्हीच हल्ला करू

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच सांगितले होते की आम्ही इराणवर हल्ला करण्यासंदर्भात विचार करत आहोत. इराणने त्यांच्या आण्विक कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुढे यायला हवे. इराणवर हल्ला करण्यासाठी आदेश द्यायचा की नाही याचा निर्णय दोन आठवड्यांच्या आत निर्णय घेतला जाईल. फोर्डोच्या दु्र्गम परिसरात हल्ला करण्यासाठी अमेरिकेने मदत केली तर ठीक नाहीतर आम्ही स्वतः कारवाई करू असा स्पष्ट इशारा इस्त्रायलने दिला आहे.

follow us