Rishi Sunak : ब्रिटिश प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्या एका वक्तव्याने अख्ख्या ब्रिटेनमध्ये (Rishi Sunak) खळबळ उडाली आहे. तसं पाहिलं तर हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे पण, आज त्याचे पडसाद उमटले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात सुनक म्हणाले होते की लॉकडाउन ऐवजी काही लोकांना मरू दिले जावे हे अधिक चांगले होईल. हा दावा दुसऱ्या तिसऱ्या कुणी केलेला नाही तर सुनक यांचेच वरिष्ठ सल्लागार डॉमनिक कमिंस यांनी केला आहे. कमिंस यांनाच आताच हा दावा का करावासा वाटला, असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
बायडन अन् सुनक यांना पिछाडले; जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी पुन्हा अव्वल
मीडियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी चीफ सायंटिफिक अॅडव्हायजर पॅट्रिक वॉलेंस यांनी आपल्या डायरीत सुनक यांच्या वक्तव्याची नोंद करून ठेवली आहे. वॉलेंस यांनी कमिंस यांच्या हवाल्याने हे वक्तव्य केले. कोरोनाच्या मुद्द्यावर झालेल्या एका बैठकीत कमिंस यांनी विचारले गेले की राष्ट्रीय पातळीवर लॉकडाउन लावले गेले पाहिजे की नाही त्यावर सुनक यांनी उत्तर देताना लॉकडाउन ऐवजी काहील लोकांना मरू दिले जावे, असे म्हटले होते.
वॉलेंस यांनी 4 मे 2020 रोजी झालेल्या बैठकीचा उल्लेख केला आहे. सुनक यांनी ज्यावेळी हे वक्तव्य केले होते त्यावेळी ते चांसलर होते. आज तीन वर्षांनंतर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे ब्रिटेनच्या राजकारणात वादळ आले आहे. या वक्तव्यावर सुनक यांनीच स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. यानंतर सुनक यांचे प्रवक्त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले की पुरावे सादर केल्यानंतरच प्रधानमंत्री यावर काही बोलतील.
India Canada Conflict : अमेरिका-ऑस्ट्रेलिया उलटले; भारताला ठेंगा, कॅनडाला पाठिंबा