India Canada Conflict : अमेरिका-ऑस्ट्रेलिया उलटले; भारताला ठेंगा, कॅनडाला पाठिंबा

India Canada Conflict : अमेरिका-ऑस्ट्रेलिया उलटले; भारताला ठेंगा, कॅनडाला पाठिंबा

India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्यानंतर कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी करत जम्मू काश्मीरसह पाकिस्तानीला हद्दीला लागून असलेली राज्ये आणि इशान्य भारतातील राज्यात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला, अशा पद्धतीने हा वाद चिघळत चाललेला असतानाच आता यात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने उडी घेत भारताला झटका दिला आहे.

हिंदूंनो, कॅनडा सोडून भारतात जा; खलिस्तानी-दहशतवाद्याने कॅनडास्थित भारतीयांना धमकावलं

ब्रिटनपाठोपाठ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातूनही भारतविरोधाचे सूर दिसून येत आहेत. या वादात मोठ्या देशांनी भारताला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी याबाबत बोलताना हे सर्व चिंताजनक असून आम्ही सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहोत. याबाबत भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे आम्ही काळजी व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले

सीबीएस न्यूजच्या हवाल्यानुसार इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद समन्वयकांची भूमिका दिली आहे. जॉन किर्बी यांनी सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणात अमेरिकेची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट केले आहे. कॅनडाने भारतावर केलेले आरोप गंभीर आहेत. कॅनेडिय तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत हे आम्हालाही माहित आहे. त्यामुळे या तपासावर काही परिणाम होईल असे काही मी बोलणार नाही. पण, तरीही आम्ही भारताला विनंती करतो की त्यांनी या तपासात सहकार्य करावे. तपास अधिक पारदर्शी व्हायला आहे.

Justin Trudeau : जस्टिन ट्रूडो अन् वाद विवाद; पंतप्रधान असतानाच घेतला होता घटस्फोट…

जी 20 परिषद नुकतीच भारतात झाली. या परिषदेसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटेन, इटली, जर्मनी यांसह अन्य विकसित देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी हजेरी लावली होती. ही परिषद यशस्वी झाल्याचे आणि जागतिक पातळीवर भारताची ताकद वाढल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र दहाच दिवसांनंतर अमेरिका,ऑस्ट्रेलिया सारखे देश भारत-कॅनडा वादात भारतावरच उलटल. या देशांच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांची वक्तव्ये तपासली असता जागतिक पातळीवर भारतविरोधी वातावरण तयार होत असल्याची शंका येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube