बायडन अन् सुनक यांना पिछाडले; जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी पुन्हा अव्वल

  • Written By: Published:
बायडन अन् सुनक यांना पिछाडले; जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी पुन्हा अव्वल

नवी दिल्ली : जागतिक नेत्यांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा एकदा त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदींच्या नावाला 76 टक्के रेटिंग देण्यात आले आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातव्या तर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Russhi sunak) हे 15 व्या स्थानावर आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट दुसऱ्या क्रमांकावर असून, बायडेन यांना 40% रेटिंग मिळाले आहे. 6 ते 12 सप्टेंबर (2023) दरम्यान हा डाटा गोळा करण्यात आला. (PM Modi Again Top In Most Popular Global Leader)

मोठी बातमी! आता ‘छत्रपती संभाजीनगर’, ‘धाराशिव’ जिल्हा; शहरांनंतर जिल्ह्यांचेही नामकरण

रेटिंगनुसार, पंतप्रधान मोदींचे रेटिंग ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यासह इतर नेत्यांपेक्षा पुढे आहे. मोदींनंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट हे 64% रेटिंगसह दुसऱ्या तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. डिसिजन इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने ही यादी जारी केली आहे.

‘मंत्रिपद नुसती भुषवायची नसतात’ : CM शिंदेंसमोरच अजितदादांनी घेतली मराठवाड्यातील मंत्र्यांची शाळा

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 48% च्या मान्यता रेटिंगसह पाचव्या, इटलीचे पंतप्रधान जी मेलोनी 42% रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहेत. सर्वेक्षणात रेटिंगसाठी 22 जागतिक नेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, 6-12 सप्टेंबर 2023 पर्यंत गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, नरेंद्र मोदींच्या यादीत मोदींच्या नावाला सर्वात कमी म्हणजे 18% नापसंती रेटिंग देण्यात आली आहे.

Sanjay Raut : टीका केल्यावर ‘सुभेदार’ सुभेदारीवर चालले; मुक्काम बदलल्यानंतर राऊतांची शिंदेंवर टीका

जगभरात अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणांमध्ये मोदीं लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर राहिले आहेत.एवढेच नव्हे तर, मोदींनी अलीकडे दिलेल्या अनेक देशांच्या भेटीतही त्यांना जागतिक नेत्यांमध्ये मोठा आदर देण्यात आल्याचे दिसून आले होते. नुकत्याच पार पडलेल्या G20 शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे आणि भारताचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या जागतिक नेत्यांनीही रशिया-युक्रेन युद्धासह इतर जागतिक समस्यांवर संयुक्त सहमती आणि निवेदन जारी केले. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube