India Iran Chabahar Port Deal : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच (India Iran Chabahar Port Deal) एक महत्वाची बातमी आली आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने ही गोष्ट खूप महत्वाची आहे. इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. आता ही घडामोड म्हणजे चीन आणि पाकिस्तानसाठी हा मोठा झटका ठरणार आहे. तर या कराराने अमेरिकेचा जळफळाट झाला आहे. जो कोणताही देश इराण बरोबर व्यापार करार करत असेल तर त्याला पुढील निर्बंधांचा सामना करण्यासाठी तयार रहावे लागेल अशी धमकीच अमेरिकेने दिली आहे. तब्बल दोन दशकांपासून दोन्ही देशात सुरू असलेल्या चर्चेनंतर या कराराला अंतिम रूप आले आहे. भारताच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्वाचा आहे. कारण भारतीय सामान अफगाणिस्तान आणि आशिया खंडातील बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवा मार्ग उपलब्ध होणार आहे.
व्यापारात हिंदी-चिनी भाई भाई; चीन बनला भारताचा नंबर वन बिजनेस पार्टनर
चाबहार पोर्ट ओमानच्या खाडीला लागून आहे. इराणमधील पहिलेच डीपवॉटर पोर्ट आहे. चाबहार पोर्ट समुद्री मार्गाने इरानला अन्य देशांशी जोडते. चाबहार पोर्ट इराणला पाकिस्तानच्या जवळही जोडते. पाकिस्तानात चीन आधीपासूनच ग्वादर पोर्ट तयार करत आहे. चाबहार एअरपोर्ट अंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉरचा भागही आहे. हे एक मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट आहे. जो हिंद महासागर आणि फारसच्या खाडीला इराणच्या माध्यमातून कॅस्पियन समुद्र आणि रशियातील सेंट पीटर्सबर्गच्या माध्यमातून उत्तर युरोपपर्यंत जोडतो. हा प्रोजेक्ट रेल्वे, रस्ते आणि समुद्र मार्गे माल वाहतुकीसाठी 7 हजार 200 किलोमीटरचा एक रुट आहे.
चाबहार सुरू झाल्यानंतर भारतासाठी एक नवा समुद्री मार्ग सुरू होईल. या माध्यमातून भारत आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण परिवहन कॉरिडॉरमध्ये इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अजरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोप यांच्याबरोबर सहज व्यापार करू शकतो. आणखी महत्त्वाचे म्हणजे समुद्री व्यापारासाठी आता भारताला पाकिस्तानला बायपास करणे अतिशय सोपे होणार आहे.
Pakistan : पाकिस्तान सरकारला धक्का! जुन्या मित्राने नाकारली मोठी ऑफर?
भारत आणि इराण दरम्यान या बंदरासाठी 2003 पासून काम सुरू होते. भारत बंदराला मदत करण्यास तयार होता. या बंदराच्या विकासासाठी 10 कोटी डॉलर्स देण्याचे आश्वासन भारताने 2013 मध्येच दिले होते. यानंतर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चाबहार बंदराचा दौरा केला होता यावेळी त्यांनी एका करारावर सही केली होती. यामध्ये चाबहारला सेंट्रल ट्रान्झिट पॉईंट म्हणून सहभागी करून घेतले होते. यानंतर 2018 मध्ये इराणचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली होती.