Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा (Afghanistan Earthquake) भुकंपाने हाहाकार उडाला आहे. यावेळचा भूकंप अतिशय शक्तिशाली ठरला. या भुकंपात तब्बल 2 हजार लोक ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम अफगाणिस्तानातील इराण सीमेजवळ या भुकंपाचे केंद्र होते. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. यानंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Israel Hamas War : परिस्थिती चिघळली! हमासनंतर आता लेबनॉनचाही इस्त्रायलवर हल्ला
या भुकंपामुळे हेरात शहरापासून सुमारे 40 किलोमीटर दूर अससेली अनेक गावे उद्धवस्त झाली आहेत. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. काही लोक या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. येथील कार्यालयाच्या इमारतीही हादरल्या. घराच्या भिंती हलत असल्याचे पाहून लोक जीव मुठीत घेऊन पळाले. कालही भुकंपाचे धक्के जाणवले होते. या भुकंंपामुळे संकटग्रस्त अफगाणिस्तानात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे.
Almost 2,000 people killed in powerful earthquakes in Afghanistan's west, says Taliban spokesman, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2023
सोशल मीडियावर या भुकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातून या भुकंपाची दाहकता लक्षात येत आहे. भूकंप इतका तीव्र होता की भिंतीवरच प्लास्टर ढासळू लागलं. भिंतीला भेगा पडू लागल्या. इमारतीचा काही देखील कोसळला असे येथील स्थानिक रहिवासी लोकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. भूकंपाची तीव्रता जास्त होती. त्यामुळे जास्त नुकसान झाले. आता स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात येत आहेत. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून मदतकार्यावर भर देण्यात आल्याचे येथील स्थानिक प्रशासनाने सांगितले.
हेरातला अफगाणिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. या शहरात तब्बल 19 लाख लोक राहतात. अफगाणिस्तानातील दाट लोकवस्तीचे हे शहर आहे. मागील वर्षातही येथे असाच शक्तिशाली भूकंप झाला होता. या भुकंपात त्यावेळी एक हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तशाच भूकंपाचा अनुभव येथील लोक घेत आहेत.
Israel Hamas War : परिस्थिती चिघळली! हमासनंतर आता लेबनॉनचाही इस्त्रायलवर हल्ला