Iran Visa Free Policy : भारतीय पर्यटकांसाठी इराणमधून आनंदाची बातमी आली आहे. इराणच्या दूतावासाने (Iran Visa Free Policy) निवेदनात म्हटले आहे की देशात येणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी पंधरा दिवसांचे व्हिसा मुक्त धोरण जाहीर करण्यात आले आहे. हा नियम 4 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे भारतीय पर्यटकांना इराणला (Iran) भेट देण्यासाठी व्हिसाची गरज राहणार नाही.
दूतावासाने एका निवेदनात (Iran India Relation) म्हटले आहे की सामान्य पासपोर्ट असलेल्या व्यक्तींना दर सहा महिन्यांतून एकदा व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश करता येईल. या व्यक्तीला जास्तीत जास्त पंधरा दिवस राहता येईल. हा कालावधी पंधरा दिवसांपेक्षा जास्त वाढविता येणार नाही. व्हिसा मुक्त प्रवेश फक्त पर्यटनाच्या दृष्टीने इराणमध्ये येऊ इच्छिणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी आहे.
थायलंड, श्रीलंकेनंतर आता मलेशियाने भारतीयांना दिली व्हिसा फ्री एंट्री, जाणून घ्या कारण?
व्यवसाय किंवा शिक्षणाच्या हेतूने इराणला जायचे असेल तर संबंधित श्रेणींमध्ये अर्ज करणे बंधनकारक आहे. जे लोक सहा महिन्यांच्या कालावधीत इराणला एकापेक्षा जास्त वेळा भेट देऊ इच्छितात त्यांना व्हिसा मिळणे आवश्यक आहे. जे भारतीय पर्यटक विमानाने इराणला पोहोचतील फक्त त्यांनाच व्हिसा मुक्त प्रवेश घेता येईल, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे. तुर्कस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान किंवा अन्य शेजारी देशांतून जमिनीमार्गे इराणमध्ये येणाऱ्यांना मात्र व्हिसा असेल तरच प्रवेश मिळणार आहे.
भारतीयांसाठी व्हिसा मुक्त देश
इराणआधी अलीकडेच श्रीलंका, मलेशिया आणि थायलंडने भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा फ्री धोरण जाहीर केले आहे. या देशांव्यतिरिक्त भूतान, नेपाळ, इथिओपिया, इंडोनेशिया, जमैका, जॉर्डन, कझाकस्तान, मॉरटेनिया, मॉरिशस, मायक्रोशिया, मोन्सेरात, मोझांबिक, म्यानमार, नियू, ओमान, पलाऊ बेट, कतार, अंगोला हे शेजारी देश आहेत. बार्बाडोस, बोलिव्हिया, ब्रिटीश व्हर्जिन बेटे, बुरुंडी, कंबोडिया, केप वर्दे बेटे, कोमोरो बेटे, कुक बेटे, जिबुती, डॉमिनिका, एल साल्वाडोर, फिजी, गॅबॉन, ग्रेनाडा, गिनी बिसाऊ, हैती, रवांडा, सामोआ, सेनेगल, सेशेल्स, सोमालिया, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट लुसिया, सेंट विन्स, टांझानिया, तिमोर, टोगो, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ट्युनिशिया, तुवालू, वानुआतू, झिम्बाब्वे आणि ग्रेनाडा या देशांनीही भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा मुक्त धोरण जाहीर केले आहे.
मोठी बातमी : वाढत्या तणावात कॅनडाला भारताचा मोठा झटका; अनिश्चित काळासाठी व्हिसा बंदी
श्रीलंकेने भारत, चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंडसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश उपक्रम सुरू केला आहे, जो 31 मार्च 2024 पर्यंत लागू केला जाणार आहे. थायलंडनेही भारत आणि तैवानच्या लोकांना ही सूट दिली आहे, जी 10 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे…
मलेशिया टुरिझम प्रमोशन बोर्डाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एकूण 3,24,548 भारतीय पर्यटक मलेशियामध्ये आले होते. त्यात म्हटले आहे की 2023 च्या पहिल्या तिमाहीत 1,64,566 भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट दिली, गेल्या वर्षी याच कालावधीत 13,370 पर्यटक होते.