मोठी बातमी : वाढत्या तणावात कॅनडाला भारताचा मोठा झटका; अनिश्चित काळासाठी व्हिसा बंदी

  • Written By: Published:
मोठी बातमी : वाढत्या तणावात कॅनडाला भारताचा मोठा झटका; अनिश्चित काळासाठी व्हिसा बंदी

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशदवाद्यांच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर भारत सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजन्सी असल्याचा दावा केला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जस्टिन यांच्या या आरोपांनंतर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. ( India stops visa services in Canada amid escalating diplomatic row)

जस्टिन यांच्या गंभीर आरोपांनंतर भारताकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, पुढील सूचना मिळेपर्यंत कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करण्यात येत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर दोन्ही देशातील वाद वाढत असून, याच धर्तीवर अशाप्रकारचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

कुलीचा ड्रेस डोक्यावर सामान अन्…; आनंद विहार रेल्वे स्टेशनवर दिसला राहुल गांधींचा नवा ‘अवतार’

व्हिसा सेवा निलंबित करण्याबरोबरच भारत सरकारने भारतीय नागरिकांना कॅनडामध्ये प्रवास करताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कॅनडात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी सूचना जाहीर केल्या आहेत. तसेच सतर्क राहण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाकडून अ‍ॅडव्हायझरी जाहीर…

कॅनडात होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jayshankar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) भेट घेतली. या भेटीनंतर ही अ‍ॅडव्हायझरी जाहीर करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवदेनात म्हटलं की, “कॅनडातील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या माफ केलेले द्वेषपूर्ण गुन्हे आणि गुन्हेगारी हिंसाचार लक्षात घेता, तिथल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि तिथं अंतर्गत प्रवास करु इच्छिणाऱ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे”.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube