Iran Attack on Israel : इराण आणि इस्त्रायलमधील तणाव सातत्याने वाढत चालला (Iran Attack on Israel) होता. आज या तणावाचे रुपांतर हल्ल्यात झाले. इराण केव्हाही इस्त्रायलवर हल्ला करील असा इशारा आधीच देण्यात आला होता. काल तर लेबनॉनने उत्तर इस्त्रायल भागात रॉकेट हल्ला सुद्धा केला होता. त्यानंतर काल इराणने सुद्धा इस्त्रायलवर ड्रोन हल्ला केला. इराणने इस्त्रायलच्या दिशेने डझनभर ड्रोन लाँच केले आहेत. याआधी इराणने एक जहाज ताब्यात घेतले होते. आता इराणने जे ड्रोन लाँच केले आहेत ते इस्त्रायलपर्यंत पोहोचण्यासाठी काही तास लागतील. या हल्ल्यानंतर अमेरिकेसह पश्चिमी देश भडकले आहे. त्यांच्याकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण दलाने हाय अलर्ट जारी केला आहे. यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक तातडीची बैठक तेल अवीव शहरात बोलावली आहे.
#WATCH | Tel Aviv: Iranian drones intercepted by Israel's Iron Dome, as Iran launches a drone attack against Israel by sending thousands of drones into its airspace.
(Source: Reuters) pic.twitter.com/GyqSRpUPF1
— ANI (@ANI) April 14, 2024
या हल्ल्यानंतर अमेरिकेसह सर्वच देश सावध झाले आहेत. दुसरीकडे इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांनीही एक व्हिडिओ ट्विट केला आहे. दुष्ट शासनाला शिक्षा होईल असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर इस्त्रायलने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक तातडीची बैठक बोलावली आहे. इस्त्रायल संरक्षण दलाचे प्रवक्त्यांनी सांगितले की इस्त्रायलवर डझनभर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांत इस्त्रायलचे किरकोळ नुकसान झाले.
संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही इराणने इस्त्रायलवर केलेल्या या हल्ल्याचा निषेध केला. या शत्रुत्वाचा अंत करण्याची मागणी मी करतो. आता आणखी एक युद्ध या प्रदेशाला किंवा जगाला परवडणारे नाही, असे गुटेरेस म्हणाले. परंतु, येथील सध्याची परिस्थिती पाहता तणाव चांगलाच वाढला आहे. इस्त्रायल यानंतर शांत राहिल याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे युद्ध अधिकच चिघळण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत.
Israel Hamas War : गाझावर व्यक्त व्हायला शब्द नाहीत; डब्लूएचओच्या प्रमुखांकडून इस्त्रालयची कानउघडणी
या हल्ल्यानंतर इस्त्रायलच्या सैन्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून एअरस्पेस बंद करण्यात आले आहेत. आम्ही इराणचे विमान आणि ड्रोन नष्ट करण्यास सक्षम आहोत असे इस्त्रायलने म्हटले आहे. हल्ल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहता शेजारील जॉर्डनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेसह सर्वच देश अलर्ट मोडवर आहेत.