UN सुरक्षा परिषदेत गर्जल्या भारतीय राजदूत; चीन-अमेरिकेला सुनावले खडेबोल

  • Written By: Published:
UN सुरक्षा परिषदेत गर्जल्या भारतीय राजदूत; चीन-अमेरिकेला सुनावले खडेबोल

वॉशिंगटन: भारतासह जगातील अनेक देशांची प्रदीर्घ मागणी असूनही संयुक्त राष्ट्र सुरक्षा (United Nations) परिषदेच्या सुधारणांबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. दुस-या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांवर अजूनही अमेरिका (America), चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन या पाच स्थायी सदस्यांचे वर्चस्व आहे. इतकी वर्षे उलटून गेल्यावर जगात भारत, जर्मनी, जपान यांसारख्या अनेक नवीन शक्ती उदयास आल्या आणि फ्रान्स, ब्रिटनसारखे स्थिर देश कमी झाले. या बदललेल्या परिस्थिती असूनही, भारताच्या मागण्यांकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, पुन्हा एकदा भारताने UN च्या व्यासपीठावरूनच पाचही स्थायी देशांना खडे बोल सुनावले आहेत. भारताने म्हटले आहे की 5 कायमस्वरूपी देश 188 देशांच्या सामूहिक इच्छेकडे किती काळ दुर्लक्ष करत राहतील.

CM Shinde : दाऊद, छोटा शकील सगळे आले पण मी कधी धमकीला घाबरत नाही; शिंदेंनी सांगितला ‘तो’ किस्सा 

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करताना एका निवेदनात म्हटले आहे की, 5 सदस्य देशांच्या इच्छेला आणखी किती काळ 188 देशांच्या सामूहिक इच्छेवर थोपवणार? ही 188 देशांच्या सामूहिक इच्छेची अवहेलना आहे, हे नक्कीच बदलण्याची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्व देशांना समान संधी मिळायला हवी, असे भारताने म्हटले आहे.

Jnanpith Award 2023 : प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहिर! 

कंबोज म्हणाल्या की, ग्लोबल साउथच्या देशांवर ऐतिहासिकदृष्ट्या अन्याय झाला आहे आणि तो त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणा करून स्थायी व अस्थायी सदस्यांची संख्या वाढवून त्यात आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

चीनचा संयुक्त राष्ट्रातील सुधारणांना विरोध
कंबोज म्हणाल्या की, कमकुवत देशांना समान संधी द्यायला हवी, जेणेकरून जे काही निर्णय घेतले जातील ते सर्वांच्या हिताचे असतील. या सुधारणा समानतेला चालना देण्यासाठी असल्या पाहिजेत, असे त्या म्हणाल्या कंबोज पुढं म्हणाल्या की, ‘भारताचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सर्वसमावेशक सुधारणांना पाठिंबा आहे. यामध्ये कायमस्वरूपी आणि स्थायी सदस्यांची संख्या समाविष्ट आहे. कोणत्याही देशासोबत भेदभाव होऊ नये यासाठी सुरक्षा परिषदेच्या कामकाजात सुधारणा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मात्र, चीनचा संयुक्त राष्ट्रातील सुधारणांना विरोध असल्याचं त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असलेला आशियातील एकमेव देश चीन बनू इच्छितो. या कारणास्तव चीन स्वत:च्या माध्यमातून आणि पाकिस्तानसह इतर देशांच्या माध्यमातून भारताच्या प्रयत्नांना सातत्याने रोखत आहे.

चीनसह या राष्ट्राकड व्हिटो पावर
वास्तविक, जागतिक शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या उद्देशाने दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत ज्यात पाच स्थायी सदस्य आणि 10 अ-स्थायी सदस्य आहेत. स्थायी सदस्य अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया यांच्याकडे व्हेटो पॉवर आहे आणि ते कोणत्याही ठरावाला सहजपणे रोखू शकतात. या देशांचा संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजावर मोठा प्रभाव आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube