Jnanpith Award 2023 : प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहिर!
Jnanpith Award 2023 : साहित्यातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award 2023). यंदाचा ज्ञानपीठ 2023 हा पुरस्कार प्रसिद्ध गीतकार आणि उर्दू कवी गुलजार त्या सोबतच संस्कृत भाषेचे विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे. गुलजार यांच्या उर्दू आणि रामभद्राचार्य यांच्या संस्कृत भाषेतील योगदानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.
नगरच्या कोर्टात हायहोल्टेज ड्रामा; सुषमा अंधारेला ठोकणारच, अष्टेकरांची धमकी
गुलजार यांच्या बद्दल सांगायचं झालं. तर ते हिंदी चित्रपटातील त्यांचे गाणे, तसेच चित्रपट निर्मिती आणि प्रसिद्ध उर्दू कवी हे सर्वच क्षेत्रात त्यांनी त्यांचे वेगळे स्थान निर्माण केलं आहे. या अगोदर उर्दू भाषेतील त्यांच्या योगदानासाठी 2002 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2004 मध्ये पद्मभूषण आणि त्यांच्या जवळपास पाच चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाले आहेत.
मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण; कायद्याचा मसुदा तयार : निवडणुकीपूर्वी CM शिंदे मोठा डाव जिंकणार?
चांद पुखराज का, रात पश्मीने की आणि पंद्रह पांच पचहत्तर. हे त्यांच्या काही निवडक रचना आहेत. गुलजार यांचं नाव संपूर्ण सिंह कालरा असं आहे. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 ला भारत पाकिस्तानच्या फाळणीत विभाजित झालेल्या झेलम या जिल्ह्यातील देना या गावांमध्ये झाला. त्यांचे वडील मख्खन सिंह हे छोटे व्यावसायिक होते. तर आईच्या निधनानंतर वडिलांनीच गुलजार यांचा सांभाळ केला. शिक्षणात एवढा रस नसला तरी देखील साहित्याशी त्यांची नाळ कायम जोडलेली राहिली. रवींद्रनाथ टागोर आणि शरदचंद हे त्यांचे आवडते साहित्यिक होते.
तर रामभद्राचार्य यांच्या बद्दल सांगायचं झालं तर जन्मानंतर दोन महिन्यातच त्यांची दृष्टी गेली. तरी देखील ते एक शिक्षक होते. सोबतच त्यांनी संस्कृत भाषेवरती विद्वत्ता मिळवली होती. संस्कृतसह अनेक भाषांमध्ये त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. त्यांना 22 भाषा अवगत आहेत. यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच राम मंदिर आंदोलनामध्ये देखील त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच ज्ञानपीठ निवड समितीकडून यंदा उर्दूतील योगदानासाठी गुलजार आणि संस्कृतमधील योगदानासाठी रामभद्राचार्य यांची निवड करण्यात आली गेल्यावेळी 2022 चा ज्ञानपीठ पुरस्कार हे गोव्यातील लेखक दामोदर मावजो यांना देण्यात आला होता.