Iran Execution Case : इराणमध्ये मागील वर्षात हिजाब विरोधात मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाने संपूर्ण देशालाच हादरवून सोडले होते. मग सरकारनेही आंदोलन निर्दयीपणे चिरडून टाकत आंदोलन सहभागी असणाऱ्या अनेकांना फाशीची शिक्षा सुनावली. या आंदोलनाची सुरवात 22 वर्षीय महिसा अमिनी या युवतीच्या मृत्यूनंतर झाली होती. या दरम्यान, नॉर्वे येथील ‘इराण ह्यूमन राइट्स’ (IHR) आणि पॅरिस येथील ‘टुगेदर अगेंस्ट द डेथ पेनल्टी’ (ECPM) या संस्थांनी एक सर्व्हे केला. या सर्व्हेत अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.
युक्रेनचा मोठा निर्णय; भारतातच देता येणार मेडिकलची अंतिम परीक्षा
या सर्व्हेत असे दिसून आले की इराणमध्ये मागील वर्षात फाशीच्या शिक्षेत तब्बल 75 टक्के वाढ झाली आहे. इराणमध्ये 2022 मध्ये एकूण 582 लोकांन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 202 मधील 333 या संख्येच्या तुलनेत खूप जास्त आहे. इराण सरकार अशा प्रकारची शिक्षा लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी करत आहे. आंदोलनात सहभागी असणाऱ्या आंदोलकांना अत्यंत निर्दयीपणे शिक्षा सुनावण्यात येते.
मागील वर्षातील हिजाब विरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या लोकांवर आंदोलनादम्यान पोलिसांना मारण्याचा आरोप लावण्यात आला होता. आंदोलनाच्या सुरुवातीलाच चार लोकांना फाशीवर लटकावल्यामुळे हे आंदोलन जास्तच चिघळले.
म्यानमारमध्ये रक्तपात ! ५० ठार, लष्कराचा विरोधकांवर बॉम्ब हल्ला
इराण ह्यूमन राइट्सचे निदेशक महमूद अमिरी मोघद्दाम यांनी सांगितले की या प्रकरणात जगभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या त्यामुळे देशात विरोधसंबंधी फाशीच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली. मात्र, तरीही इराण सरकार आंदोलकांना घाबरविण्यासाठी अन्य आरोपांचा वापर करत आहे. या व्यतिरिक्त येथील सरकार देशातील लोकांना नशेच्या औषधांसंदर्भातही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावते. या प्रकरणातही वाढ झाली आहे. जे अत्यंत चिंताजनक आहे, असे त्यांनी सांगितले.