Download App

अमेरिकेचा पाकिस्तानला दणका! TRF दहशतवादी संघटना घोषित; पहलगाम हल्ल्याची घेतली होती जबाबदारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या द रेजिस्टेंस फ्रंटला दहशतवादी संघटना म्हणून घोषि करण्यात आलं आहे.

Pakistan News : अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची (Pahalgam Terror Attack) जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं आहे. अमेरिकेनेच हे काम केलं आह. 22 ऑगस्ट रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. अतिरेक्यांनी फक्त हिंदू धर्मियांना गोळ्या घालून मारले होते. या हल्ल्याची जबाबदारी TRF ने स्वीकारली होती.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी सांगितले, की TRF पाकिस्तान पुरस्कृत लश्कर-ए-तैयबा या संघटनेची प्रॉक्सी आहे. ज्याला संयुक्त राष्ट्रसंघाने आधीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. हा निर्णय ILA Section 219 अंतर्गत INA आणि Executive Order 13224 नुसार घेण्यात आल्याचे रुबियो यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या या निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

भारताच्या कारवाईची ‘TRF’ला धडकी, मारली पलटी; पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली

टीआएफने आधी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता. सन 2008 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला होता. टीआरएफने भारतीय सुरक्षा दलांवर हल्ल्याचीही जबाबदारी घेतली आहे. आता अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयानंतर टीआरएफच्या आर्थिक आणि दळणवळणाच्या संसाधनांवर अमेरिकेचे निर्बंध लागू होतील. तसेच जागतिक पातळीवर या संघटनेला दहशतवादाचे प्रायोजक म्हणून घोषित केले जाईल.

2019 मध्ये टीआरएफची स्थापना

टीआरएफ या संघटनेची स्थापना ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर (Jammu Kashmir) दोनच महिन्यांत ही संघटना (Article 370) अस्तित्वात आली होती. ही संघटना लश्कर-ए-तैयबासाठी काम करत असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी 2023 मध्ये भारत सरकारने या संघटनेवर बंदी घातली होती. संघटनेचा प्रमुख नेता शेख सज्जाद गुल याला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.

पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

follow us