Download App

पाकिस्तानात घमासान! ‘बलूच आर्मी’चा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; 10 ठार, 2 शहरांवर कब्जा

Pakistan News : चीनच्या मदतीने पाकिस्तानातील अशांत (Pakistan News) बलुचिस्तान प्रांतात धुडगूस घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानातील (Balochistan) माच आणि बोलन शहरातील सैन्याच्या ठिकाणांवर एकापाठोपाठ हल्ले केले. यानंतर ही शहरे ताब्यात घेतल्याचा दावा आर्मीने केला. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर काही सैनिकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

बीएलएने एका निवेदनात म्हटले आहे, की माच आणि बोलान शहरात मोहिम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईत बीएलचे स्पेशल युनिट, विशेष तुकडी आणि गुप्तहेर विभागाचा समावेश आहे. या मोहिमेची घोषणा करताना प्रवक्त्याने लोकांना त्यांच्या घरात राहण्यास आणि महामार्गांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. याआधी माच शहरात मोठा स्फोट झाला होता त्यानंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. या कारवाईत माच शहरातील अनेक सरकारी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या

बीएलएच्या सैन्याने लष्करी कमांडंट कार्यालय आणि जेल कॉलनीसह अनेक रेल्वे स्टेशन्सवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तान सरकारने मान्य केले आहे की सोमवारी मध्यरात्री तीन मोठे हल्ले झाले. यासाठी रॉकेट आणि घातक शस्त्रांचा वापर करण्यात आला. बीएलएचे हे हल्ले अपयशी ठरल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. मागील काही तासांपासून बलोच बंडखोर आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक मात्र सुरूच आहे.

या दरम्यान, बोलान शहरातील प्रत्येक रस्त्यावर बॉम्ब पेरण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून लोकांनी त्यापासून दूर राहावे, असे सांगितले गेले आहे. बीएलएचे सर्व हल्ले निकामी केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला आहे. रेल्वे स्टेशन आणि सरकारी इमारती या हल्ल्यांचे टार्गेट ठरल्या आहेत. यानंतर बीएलएने एक व्हिडिओ जारी केला आहे. अनेक पाकिस्तानी सैनिकांना पकडण्यात (Pakistan Army) आल्याचा दावा या व्हिडिओद्वारे करण्यात आला आहे. पाकिस्तानी लष्कराने सांगितले की जवळच्या डोंगरांवरून किमान 15 रॉकेट डागण्यात आले. यानंतर बलूचांनी लष्कराच्या चौक्यांवर जोरदार हल्ला केला. यानंतर प्रदेशातील सर्व रुग्णालयांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. माच तुरुंगात 800 कैदी आहेत त्यातील बहुतांश बलोच असल्याचे सांगितले जात आहे.

Taliban Attack : इराणनंतर तालिबान! अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्यावर हल्ला; तणाव वाढला

follow us

वेब स्टोरीज