Download App

पाकिस्तानला झटका! दहशतवादी हल्ल्यानंतर चीनकडून वीज प्रकल्पांचे काम बंद

Chinese Companies Stopped Work in Pakistan : पाकिस्तानात चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. येथील कामांसाठी (Pakistan) चीनमधील नागरिक पाकिस्तानात स्थलांतरीत झाले आहेत. परंतु, या विकासकामांवर सातत्याने हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी झालेल्या हल्ल्याच पाच चिनी अभियंत्यांचा (China) मृत्यू झाला होता. यानंतर चीन चांगलाच खवळला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी चीनी कंपनीने बांधलेल्या दासू जलविद्यूत केंद्राच्या वाहनांवर हल्ला केला. यामध्ये 5 चीनी अभियंत्यांचा मृत्यू झाला.

बिशम भागातील काराकोरम महामार्गावर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने चीनी अभियंते प्रवास करत असलेल्या बसला धडक दिली. या घटनेनंतर चीन सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोन्ही प्रकल्पांवर काम करणाऱ्या 191 चीनी अभियंत्यांनी काम बंद केले आहे. दोन्ही प्रकल्पांतील स्थानिक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा

या घटनेनंतर चीनी कंपनीने दासू धरणाचे (Dasu Dam) काम थांबवले आहे. अप्पर कोहिस्तान जिल्ह्यातील 4 हजार 320 मेगावॅटच्या दासू धरणावर सुमारे 741 चीनी आणि सहा हजार स्थानिक लोक काम करत आहेत. यानंतर डायमर धरणाचे कामही बंद करण्यात आले आहे. या धरणावरील जलविद्यूत प्रकल्पाच्या माध्यमातून 4 हजार 800 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दीष्ट आहे. या धरणावर साधारण 250 चीनी लोक काम करत आहेत.

दरम्यान, आता अशी माहिती मिळत आहे की खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तीन प्रकल्पांव काम करणाऱ्या चीनी कंपन्यांनी काम थांबवले आहे. तसेच येथील 1500 नागरिकांना बाहेर काढण्याचे काम चीनने सुरू केले आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे की ते आता अधिक जोखीम घेऊ शकत नाहीत.

या प्रकल्पांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की दासू आणि दियामेर-भाषा धरणांतून चिनी नागरिकांना लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने किंवा रस्त्यांवर संचारबंदी लागू करून बाहेर काढण्यात येईल. चीन सरकारचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे. चीनने पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्पांत मोठी गुंतवणूक केली आहे. तसेच चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पातही पाकिस्तानचा समावेश आहे. बलुचिस्तान भागातील ग्वादर बंदर परिसरात मोठी विकासकामे  सुरू आहेत. परंतु, या भागात सातत्याने हल्ले  होत असल्याने चीन सरकारही हैराण झाले आहे.

Pakistan News : पाकिस्तानात इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; अनेकांना अटक

follow us

वेब स्टोरीज