Download App

ट्रम्पना भिडणाऱ्या एलन मस्कची तलवार म्यान, मागितली माफी; म्हणाले, “मला दुःख वाटतं की..”

मस्क यांच्या टीकेची धार बोथट झाली आहे. मस्क चक्क माफी मागण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. मस्कने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Elon Musk Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) दोघांत वाद पेटला होता. ट्रम्प सरकारमध्ये राहून काम करणारे मस्क ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरोधात उतरले होते. त्यांच्यावर अगदी सर्रास टीका करत होते. ही टीका थेट सोशल मीडियावर (Social Media) केली जात होती. पण आता मस्क यांच्या टीकेची धार बोथट झाली आहे. मस्क चक्क माफी मागण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. मस्कने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. जे झालं ते खूप झालं. असे शब्द या पोस्टमध्ये आहेत.

एलन मस्कने या पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली. ‘मागील आठवड्यात मी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीत ज्या काही पोस्ट शेअर केल्या त्याबद्दल मला आता पश्चात्ताप होतोय. आता गोष्ट बरीच पुढं गेली आहे.’ असे मस्कने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याआधी मागील आठवड्यात मस्कने अनेक चकीत करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. मी जर नसतो तर कदाचित डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत पराभूत झाले असते अशी एक पोस्ट त्यांनी शेअर केली होती. इतकेच नाही तर मधल्या काळात मस्कने ट्रम्प यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले होते.

डोनाल्ड ट्रम्पची थेट धमकीच..

एलन मस्ककडून होत असलेल्या टीकेला ट्रम्प यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मस्क यांच्या कंपन्यांना दिलेलं अनुदान आणि सरकारी करार रद्द करण्याची धमकीच ट्रम्प यांनी दिली होती. एलन मस्क आणि माझ्यात चांगले संबंध होते. पण मला माहिती नव्हतं की पुढे हे संबंध असेच राहतील किंवा नाही. आता मी खूप निराश झालो आहे कारण मी एलनची खूप मदत केली आहे अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.

Video : लॉस एंजेलिस आउट ऑफ कंट्रोल; अॅपलच्या दुकानात तोडफोड अन् लुटालूट

अमेरिकेत हिंसक आंदोलनांचं कारण काय

अमेरिकेतील लॉस एंजेलिससह आणखी काही शहरांत आंदोलने सुरू आहेत. नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. लुटालूट आणि जाळपोळ सुरू आहे. लॉस एंजेलिस शहरात याची तीव्रता जास्त आहे. सरकारने अवैध प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर आंदोलने सुरू झाली आहेत. आंदोलक सरकारच्या या कारवाईचा विरोध करत आहेत. या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. याचबरोबर कॅलिफोर्नियाचे राज्यपाल आणि लॉस एंजेलिसचे महापौर यांनी माफी मागावी असे म्हटले होते.

follow us