Download App

पैसा रशियाचा पण, व्याज युक्रेनला? EU च्या प्लॅननं केली रशियाची कोंडी

रशियावरील निर्बंधांमुळे जप्त करण्यात आलेल्या संपत्तीवर जमा व्याज युक्रेनला देण्याचा विचार युरोपियन युनियनने केला आहे.

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन (Ukraine Russia War) वर्षांनंतरही सुरूच आहे. युद्ध मिटवण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. युद्ध सुरू ठेवण्यासाठी आता युक्रेनला पैशांची गरज भासू लागली आहे. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन रशियाच्या (Vladimir Putin) बाजूने वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनसाठी गुडन्यूज ठरू शकते अशी माहिती हाती आली आहे.

सध्या खार्किव्ह शहरात जोरदार संघर्ष सुरू आहे. युद्ध सुरू ठेवण्यासाठी युक्रेनला पैसे आणि शस्त्रांची (Ukraine) गरज आहे. परंतु या दोन्ही गोष्टींची कमतरता जाणवत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वेलोदिमिर झेलेंस्की यांनी अनेक वेळा याची कबुली सुद्धा दिली आहे. आता युरोपमधून जी बातमी येत आहे त्यामुळे युक्रेनच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.

Russia-Ukraine War : रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचा हॅरि पॉटर कॅसल आगीच्या भक्ष्यस्थानी; 4 जणांचा मृत्यू

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने यूक्रेनवर हल्ला केला होता. या गोष्टीला आता दोन वर्षे उलटून गेली आहेत. रशियाच्या या कारवाईमुळे पाश्चिमात्य देश आणि युरोपातील देश चांगलेच भडकले. त्यांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले. रशियाच्या अर्ध्यापेक्षा जास्त विदेशी संपत्तीवर टाच आणली. जवळपास ३२७ अब्ज डॉलर्स इतकी मोठी रक्कम आहे. यातील २१८ बिलियन डॉलर्स युरोपियन युनियनच्या ताब्यात आले. जप्त केलेली ही रक्कम आता व्याज देऊ लागली आहे. दोन वर्षात या रकमेवर 6 अब्ज डॉलर्स इतके व्याज जमा झाले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी युरोपियन युनियनच्या युक्रेनच्या (European Union) मदतीसाठी 50 बिलियन डॉलर्स मदत देण्याची योजना आखत असताना या व्याजाच्या रकमेवर चर्चा करण्यात आली. ही व्याजाची रक्कम यूक्रेनला का देऊ नये असे विचारण्यात आले. त्यामुळे आता आगामी काळात ही रक्कम युक्रेनला दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या रकमेचा वापर झेलेन्स्की सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि रशिया विरुद्धचे युद्ध सुरू ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन

रशियाच्या हल्ल्यात युक्रेन मधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. आता ही शहरे पुन्हा उभी करण्यासाठी सरकारला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागणार आहे. इतका पैसा खर्च करण्याची क्षमता युक्रेन सरकारमध्ये नाही. युरोपियन युनियनकडून मदत मिळाली तर अडचणी काही प्रमाणात कमी होतील. युरोपप्रमाणेच अमेरिकी संसदही युक्रेनला मदत करावी या मताचे आहेत. मागील महिन्यात युक्रेनला ६० अब्ज डॉलर्स मदत म्हणून देण्यास संसदेने तयारी दर्शवली होती.

follow us

वेब स्टोरीज