Heat : जगात 80 लाख श्रीमंतांमुळे तापमान वाढतंय; 19 लाख मृत्यूचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

आंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमने संशोधन केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Heat

Heat

Heat : जगभरातील 80 लाख श्रीमंत लोकांनामुळे तापमान (Heat) वाढत असून तब्बल 19 लाख नागरिकांना धोका असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आलीयं. या हवामान बदलाला जगातील श्रीमंत लोकंच कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आलायं. आंतरराष्ट्रीय संस्था ऑक्सफॅमद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात याबाबत चिंता व्यक्त करण्यात आलीयं. या अहवालाच्या निष्कर्षानुसार सर्वांत श्रीमंत 0.1 % लोकांचे कार्बन उत्सर्जन जागतिक लोकसंख्येच्या सर्वात गरीब 44 टक्के लोकांच्या एकूण उत्सर्जनापेक्षाही अधिक आहे.

80 लाख लोकांद्वारे निर्माण होणारे प्रदूषण…
सुमारे 80 लाख अत्यंत श्रीमंत व्यक्तींमुळे निर्माण होणारे प्रदूषण हे सुमारे 3.5 अब्ज लोकांच्या एकत्रित उत्सर्जनापेक्षाही अधिक आहे. ही आकडेवारी दर्शवते की, हवामान संकट केवळ पर्यावरणाशी संबंधित प्रश्न नाही, तर त्याचा संबंध श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या विषमतेशीही आहे. याचा परिणाम केवळ हवेची गुणवत्ता किंवा तापमानापुरता मर्यादित नाही. पूर, अति उष्णता किंवा दुष्काळामुळे होणाऱ्या नुकसानीनंतर, गरीब कुटुंबांकडे अनेकदा आपले आयुष्य पुन्हा सावरण्यासाठी आवश्यक निधी, विमा किंवा सुरक्षित निवारा नसतो. दरम्यान, अहवालानुसार, जगातील सर्वात श्रीमंत 0.1% लोकांकडे जगातील एकूण संपत्तीपैकी 19% संपत्ती आहे.

तर दुसरीकडे अत्यंत श्रीमंत व्यक्ती जे खाजगी विमाने, मोठी घरे आणि ऊर्जेचा अतिवापर करणारी जीवनशैली बाळगतात. अशा उद्योगांमध्येही गुंतवणूक करतात, त्यामुळे प्रदूषण निर्माण होते. हवामान संकटाचा सर्वाधिक फटका अशा लोकांना बसतो, ज्यांचे या संकटात योगदान सर्वात कमी असते. हवामान-संबंधित आपत्तींमुळे होणारे नुकसान गरीब समुदायांना अधिक असुरक्षित बनवू शकते, असं अहवालात नमूद करण्यात आलंय.

श्रीमंतांकडून होणारे अधिक उत्सर्जन : जगातील सर्वात श्रीमंत ०.1% लोक, सर्वात गरीब 44% लोकसंख्येच्या तुलनेत अधिक कार्बन प्रदूषण निर्माण करतात.
गरिबांवर आपत्तींचा भार : पूर, दुष्काळ आणि अति उष्णतेचा सर्वाधिक फटका गरीब कुटुंबांच्या उपजीविकेला, अन्नसुरक्षेला आणि घरांना बसतो.

श्रीमंत लोकांची जीवनशैली वाढत्या कार्बन प्रदूषणात कशी भर घालते?
एका अहवालानुसार, जगातील अत्यंत श्रीमंत व्यक्तींचे कार्बन उत्सर्जन त्यांच्या जीवनशैलीशी आणि त्यांच्या गुंतवणुकीशी संबंधित आहे. खाजगी विमाने, मोठी वाहने, आलिशान घरे आणि ऊर्जेचा अधिक वापर करणाऱ्या सोयीसुविधा, या सर्व गोष्टींमुळे त्यांचा ‘कार्बन फूटप्रिंट’ वाढतो. याव्यतिरिक्त, तेल, वायू आणि कोळसा यांसारख्या प्रदूषणकारी उद्योगांमधील त्यांची गुंतवणूकही हवामान संकटाला अधिक गंभीर बनवते.

जगभरातील खाजगी विमाने केवळ दोन सेकंदात इतके कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करतात, जेवढे उत्सर्जन जगातील सर्वात गरीब निम्मी लोकसंख्या संपूर्ण वर्षात करते. २०२५ मध्ये, खाजगी विमानांमुळे सुमारे १ कोटी ६० लाख (१६ दशलक्ष) टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन झाले. जगभरात केवळ अडीच लाख (२,५०,०००) लोक खाजगी विमानांचा वापर करतात.

याचा अर्थ असा नाही की केवळ श्रीमंतांची जीवनशैलीच हवामान बदलाला कारणीभूत आहे. वीज निर्मिती, उद्योग, वाहतूक आणि शेती यांसारख्या विविध मानवी क्रियाकलापांमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. मात्र, हा अहवाल अशा व्यक्ती आणि कंपन्यांना जबाबदार धरण्यावर भर देतो, ज्यांच्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढते.

दरम्यान, जगातील श्रीमंत लोक त्यांच्या जीवनशैली आणि गुंतवणुकीद्वारे अधिक कार्बन उत्सर्जन करतात. महागड्या गाड्यांतून प्रवास करणे, खाजगी विमानांचा वापर आणि वारंवार होणारा हवाई प्रवास हे यातील प्रमुख घटक आहेत. वाहतुकीची ही साधने पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचा वापर करतात, ज्यातून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. याव्यतिरिक्त, तेल, वायू आणि कोळसा कंपन्यांचे कामकाज ज्याला श्रीमंतांच्या गुंतवणुकीचा पाठिंबा असतो. ते देखील उत्सर्जनात वाढ करते. याउलट, गरीब लोकसंख्येच्या आवाक्यात संसाधने कमी असतात आणि त्यांचा उपभोगही मर्यादित असतो, परिणामी त्यांचा कार्बन फूटप्रिंट कमी असतो.

Exit mobile version