विदर्भातील शाळांना उकाड्याचा फटका! राज्य सरकारकडून तारखांमध्ये बदल…

विदर्भातील शाळांना उकाड्याचा फटका बसला असून येत्या 22 जूनपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलायं.

Heat wave

School Openings In Vidarbha : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलायं. (School Openings In Vidarbha ) विदर्भातील शाळा 22 जूनपासून तर इतर जिल्ह्यांतील शाळा 15 जूनपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्यातील इतर भागात तापमान पूर्ववत होत आलंय, मात्र विदर्भात अद्यापही तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे विदर्भातील शाळा आता 22 जूनपासून सुरु होणार आहेत.

मोठी बातमी! काँग्रसला निवडणुकीपूर्वी धक्का; उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद

यंदाचा उन्हाळा कडक होता. विदर्भात तापमानाने उच्चांकी गाठल्याने नागरिकांना उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. आता मान्सून सुरु झालेला असला तरीही नागरिकांना उन्हाच्या झळा बसत असल्याचं दिसून येत आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या शाळा 15 जूनपासून सुरु करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याने राज्य सरकारने विदर्भातील शाळांच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. विदर्भात अद्यापही तापमान जैसे थेच असल्याने 22 जून ते 30 जूनदरम्यान विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. तर 1 जुलैपासून नियमित वेळेत भरणार असल्याचंही राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

मोठी बातमी! काँग्रसला निवडणुकीपूर्वी धक्का; उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद

दरम्यान, विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये 44.8, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे प्रत्येकी 44 अंश तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि नागपूरमध्ये 44.4, तर ब्रह्मपुरीमध्ये 44.7 अंश तापमान नोंदवले गेले. गोंदिया येथे तापमान 43.02 अंशांपर्यंत पोहोचले असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

दरम्यान, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने अक्षरशः कडेलोट गाठल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला असून काही ठिकाणी 45 अंशांचाही टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनानेही काही ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

follow us