Download App

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा! सोन्यावर कोणताही टॅरिफ आकारणार नाही; भारताला दिलासा

वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी सांगितले की सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ आकारला जाणार नाही.

Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक (Donald Trump) मोठी घोषणा केली आहे. द वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी सांगितले की सोन्यावर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ आकारला जाणार नाही. याआधी कस्टम आणि सीमा सुरक्षा विभागाने स्पष्ट केले होते की सोन्यावर (Gold) जबरदस्त टॅरिफ आकारला जाऊ शकतो.

आता ट्रम्प यांनी स्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉम ट्रूथवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सोन्यावर टॅरिफ आकारणार नसल्याचे म्हटले आहे. सोन्यावरही टॅरिफ आकारला जाईल अशी अफवा पसरली होती यामुळे दरात मोठी वाढ झाली होती. सोन्याच्या भावातील ही वाढ विनाकारण होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केल्यानंतर आता सोन्याचे भाव पुन्हा कमी होऊ लागले आहेत.

ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला…,पण.. भारतावर परिणाम शून्य..कसा?

कस्टम अधिकाऱ्यांच्या पत्राने खळबळ

मागील आठवड्यात अमेरिकी कस्टम अधिकाऱ्यांनी एक पत्र जारी केले होते. यात म्हटले होते की एक किलो आणि 100 औंस सोन्याला टॅरिफच्या कक्षेत आणले गेले पाहिजे. या पत्रानंतर सोने व्यापारी आणि गुंतवणूकदार धास्तावले होते. जागतिक बाजारातही परिणाम दिसू लागला होता. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर स्थिती स्पष्ट झाली आहे. सोन्यावर कोणताही टॅरिफ आकारला जाणार नाही. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांच्या मते या निर्णयामुळे सोन्याच्या किंमती आणि सोन्याच्या जागतिक बाजारात स्थैर्य कायम राहिल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत ट्रम्प यांचं हे रेकॉर्ड राहिलं आहे की ते आपल्या निर्णयावरून लगेचच पलटी देखील मारतात, त्यामुळे ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय अंतिम आहे, असं म्हणणं घाईचं ठरेल असं मत आतंरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतिन या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेतला असावा असं देखील बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आम्ही बुडालो, तर अर्धे जग सोबत घेवून जावू! अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला दिली अणुहल्ल्याची धमकी

follow us