Download App

पती दहशतवादी, पत्नी मानवधिकार मंत्री! यासिन मलिकच्या पत्नीचा पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात समावेश

  • Written By: Last Updated:

दहशतवाद्याची पत्नी मानवाधिकार मंत्री बनल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? नक्कीच नाही. पण आता आपल्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये असं झालं आहे. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकड (Anwar-ul-Haq Kakad) यांनी यासिन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिक (Mushal Hussain Malik) हिला राज्यमंत्रिपद दिले आहे.

डॉनच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी मुशाल मलिकचा 18 सदस्यीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांचा मानवाधिकार विषयक सल्लागार म्हणून समावेश केला आहे.

मुशाल मलिक कोण आहेत?
मुशाल हुसैन मलिक ही पाकिस्तानमधील चित्रकला कलाकार आहे. ती सुरुवातीपासूनच काश्मीरबाबत पाकिस्तानात विष ओकत आली आहे. यादरम्यान तिची भेट दहशतवादी यासिन मलिकशी झाली. त्यानंतर दोघांनी 22 फेब्रुवारी 2009 रोजी इस्लामाबादमध्ये लग्न केले. मुशालचा जन्म 1986 मध्ये कराची (पाकिस्तान) मध्ये झाला. मुशालने हायस्कूलचे शिक्षण इस्लामाबादमधील पाकिस्तानमधील सर्वात प्रसिद्ध शाळा बीकनहाऊसमधून केले. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे.

कोविड सेंटर घोटाळा; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना 5 दिवसांची पोलिस कोठडी 

मुशाल मलिकची आई, रेहाना हुसैन मलिक ह्ा पीएमएल-एन महिला विंगच्या सरचिटणीस होत्या, तर तिचे वडील एमए हुसैन मलिक हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ होते. तो बॉन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.ते स्तंभलेखकही होते.

मुशाल हुसैन मलिक ही पीस अँड कल्चर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आहे. ही संघटना जागतिक शांतता आणि सौहार्दासाठी जगभरात मोहीम राबवते. याशिवाय संस्कृती आणि वारसा जपण्याचेही या संस्थेचे कार्य आहे. मुशाल स्वतःला मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून सांगते. यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक ह्या आपली 12 वर्षांची मुलगी रजिया सुल्तानासोबत इस्लामाबादमध्ये राहते.

मुशाल मलिकचा पती फुटीरतावादी नेता यासिन मलिक तुरुंगात आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) नोंदवलेल्या दहशतवादी-निधी प्रकरणात मलिकला 2019 च्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली न्यायालयाने मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

पाकिस्तानमध्ये लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार
अन्वर-उल-हक काकड यांची 12 ऑगस्ट रोजी पाकिस्तानमधील आगामी सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. काकर हे बलुचिस्तान प्रांतातील पश्तून आहे आणि बलुचिस्तान अवामी पार्टीचे (बीएपी) सदस्य आहेत. पाकिस्तानमध्ये पुढील काही महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us