मुंबईतील मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटल्याचा आरोप, फैयाज प्रेमजीविरोधात 700 पानी चार्जशीट

या प्रकरणात पोलिसांनी माझगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून, त्यामध्ये 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब समाविष्ट असल्याचं समोर आलं आहे.

Untitled Design   2026 10 03T115556.423

Untitled Design 2026 10 03T115556.423

700 pages charge sheet against Faiyaz Premji : मुंबईतील मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान कथितरित्या विषारी कॅप्सूल वाटून मोठ्या संख्येने लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यातील 39 वर्षीय फैयाज प्रेमजी याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी 700 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांच्या आरोपानुसार, प्रेमजीने 50 किलोहून अधिक झिंक फॉस्फाइड मागवलं होतं. हे रसायन सामान्यतः उंदीर मारण्यासाठी वापरलं जातं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्याच्या आधी तो डोंगरीतील एका लॉजमध्ये सुमारे दोन आठवडे राहिला आणि याच ठिकाणी त्याने 15 हजारांहून अधिक विषारी कॅप्सूल तयार केल्या.

या प्रकरणात पोलिसांनी माझगाव न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून, त्यामध्ये 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब समाविष्ट असल्याचं समोर आलं आहे. प्रेमजी सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. पोलिसांच्या तपासानुसार, त्याने सुमारे 30 हजार रिकाम्या कॅप्सूल मागवल्या होत्या आणि त्याच्याकडून 14 हजार 900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. पोलिसांच्या आरोपानुसार, प्रेमजी या कॅप्सूल मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी लोकांना वेदनाशामक किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांच्या नावाखाली देत होता.

फ्लायदुबईच्या कॉकपिटमध्ये हल्ल्याचा आरोप, हमाम अलहमामी कोण? उड्डाणबंदीपासून कॉकपिटपर्यंतचा प्रवास

मिरवणुकीत सहभागी असलेल्या सलमान सय्यद याने अशी एक कॅप्सूल घेतल्यानंतर त्याला उलट्या आणि पोटाशी संबंधित त्रास जाणवला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. 26 जून रोजी मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना प्रेमजी कॅप्सूल वाटताना दिसला. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि आणखी कॅप्सूल वाटण्यापूर्वी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान त्याने मिरवणुकीतील लोकांना लक्ष्य करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं. मात्र, या प्रकरणातील हेतू आणि इतर बाबींचा तपास तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूलमध्ये नेमकं कोणतं रसायन होतं, याची खातरजमा करण्यासाठी त्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात त्यामध्ये झिंक फॉस्फाइड असल्याचं आढळल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे; मात्र अंतिम फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल मिळाल्यानंतर तो पूरक आरोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला जाणार आहे.

दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन

पोलिसांच्या माहितीनुसार, किमान 10 जणांनी या कॅप्सूल घेतल्या असाव्यात. मात्र विषबाधेची लक्षणं जाणवल्यानंतर केवळ दोघांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे प्रत्यक्षात किती लोकांनी या कॅप्सूल घेतल्या, याचा तपास अद्याप सुरू आहे. काहींनी स्वतःहून उपचार घेतले असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रेमजी हा BBA पदवीधर असून पुण्यात वडिलांच्या पेंट निर्मिती व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी यापूर्वी दिली होती. त्याच्या कथित हेतूमागे समुदायातील काही व्यक्तींविषयी असलेला राग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी तपास सुरू असून, आरोपपत्रातील दावे आणि पुराव्यांवर पुढील न्यायालयीन प्रक्रियेत सुनावणी होणार आहे.

Exit mobile version