मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोडी मोकळी होणार, टोल घेऊ नका, डीसीएम शिंदेंचे आदेश

बोरघाटात गॅस टँकर पलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती, या गळतीमुळे आणखी धोका वाढून मोठे नुकसान झाले असते

News Photo   2026 02 04T220554.843

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोडी मोकळी होणार, टोल घेऊ नका, डीसीएम शिंदेंचे आदेश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या 30 तासांपासून वाहनांच्या (Trafic) रांगाच रांगा लागल्या असून प्रवासी चांगलेच ताटकळले आहेत. महामार्गावरील बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची आता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून, या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी आणि पोलिसांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत.

बोरघाटात गॅस टँकर पलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती, या गळतीमुळे आणखी धोका वाढून मोठे नुकसान झाले असते. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी 20 तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले. प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे, त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे.

मोठी बातमी : 20 तासांपासून एक्सप्रेस वे वर महाकोंडी; एसटी प्रशासनाचा सर्व बस रद्द करण्याचा निर्णय

एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, प्रवाशांना एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल असं सांगून त्यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितलं आहे.

Exit mobile version