बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Beed) कारागृहात असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी कारागृहातील बंदीला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण केल्याचा दावा करणारी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यावरून खळबळ उडाली असून बीड जिल्हा कारागृहात काय सुरू आहे. असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बीड जिल्हा कारागृहातील बंदीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. जेलमध्ये मारहाण झाल्याचं नातेवाईकांना सांगतानाची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरलं झाली आहे. या कॉल रेकॉर्डिंगची लेट्सअप मराठी पुष्टी करत नाही. कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा या कॉलमध्ये केला आहे. अजहर अब्दुल पठाण असं मारहाण झालेल्या बंदीचं नाव असल्याचं कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या प्रकरणातही आलं नाव
सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर शेफ मला मारहाण केली. माझा हात उखडला आहे, उपर की हड्डी निकल आयी है… कॉल रेकॉर्डिंगमध्ये धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. तर मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपने खळबळ उडाली आहे.
क्लिपमध्ये संवाद काय?
जेलमधील पोलीस माझं ऐकत नाहीत, त्यांच्याशी मिळाले आहेत. पैसे घेतले त्यांनी मला न्याय देत नाहीत, जेलरला सांगितलं पण तो त्यांच्याच माणूस आहे. पहिला जेलर चांगला होता, त्याची यांनीच बदली केली. चांदणे साहेबांना सुप्रिटेंड यांनीच बनवले आहे. ते माझं ऐकत नाही, उलट मलाच धमक्या देत आहेत. तुझी जेल बदली करू असं म्हणत आहेत. तर, माझ्या घराच्या लोकांना फोन करून धमक्या देत आहेत. आमचं कोणी काही वाकड करू शकत नाही. संतोष देशमुख करून टाकील अशी धमकी दिली.
मी कोर्टाला सांगेल असं म्हटलं तर कोणाला सांगायचं ते सांग, आमचं कोणीही वाकडं करु शकत नाही अस सांगत आहेत. मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. किती लोक मारतात ते मला दवाखान्यात पण घेऊन गेले नाहीत. जेलर आणि सगळे कर्मचारी त्यांना मिळाले आहेत. मला न्याय द्या. जागेवरून उठ म्हणून मारहाण केली. आम्ही 6 नंबरच्या बराकमध्ये आहे, त्याची खूप दहशत असून कर्मचाऱ्यांनीही धमक्या देतात. मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली, असाही उल्लेख करण्यात आला आहे.
