सिल्लोड विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्ता यांनी बाजी मारली त्यांचा मुला आमेर सत्तार विजयी झाला असून येथे भाजपाचे त्र्ययंबक गव्हाणे पराभूत झाले आहेत. आपल्या मुलासाठी सत्तार यांनी वेगळा अंभई जिल्हा परिषदेचा गट तयार केला होता.
Zilla Parishad Election Result LIVE : जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा? वाचा प्रत्येक निकाल
माझ्या नावातच ‘सत्ता’आहे, असं छातीठोकपणे सांगणारे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजकारणातील वेगळा डाव यशस्वी झाला आहे. जिल्हा परिषदेतील एक गट आपल्या विधानसभा मतदारसंघात निर्माण करत त्याच गटातून सत्तार यांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या राजकीय लाँचिंगची तयारी सुरू केली होती. त्यांना तिथं यश आलं आहे.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढत अब्दुल सत्तार यांनी पाचव्यांदा सिल्लोड नगपालिका एकहाती जिंकली. स्वतः अब्दुल सत्तार, त्यांच्या पत्नी, मुलगा यांनीच सर्वाधिक काळ नगराध्यक्ष म्हणून या नगरपालिकेवर वर्चस्व राखलं. आता पुन्हा दुसऱ्यांदा समीर अब्दुल सत्तार याला नगराध्यक्ष करत त्यांनी सुत्रं आपल्याच हाती ठेवली आहेत. मतदारसंघातील बहुतांश संस्था, बाजार समिती, सोसायट्या, नगरपंचायती सत्तार यांच्याच ताब्यात आहेत.
