शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांना दुसरा धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुलाचा अर्ज बाद

भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा डोळा आता सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आहे.

Chhatrpati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (Bank) बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत राजकारण तापलं आहे. विधानपरिषद निवडणुकीत मुलाचा अर्ज दाखल करून बंडखोरी केलेले आणि पुन्हा आपल्या मुलाचा अर्ज माघारी घेतलेल्या शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाला आहे.

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती. येथे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, रमेश बोरनारे, समीर सत्तार यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यावरील सुनावणी सायंकाळी उशीरा संपली.

ते माझ्या ताटात जेवले तरी त्यांच्या मतदार मला; दानवेंचा अब्दुल सत्तारांना टोला

दरम्यान, या छाननीत अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांचा आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्य मुलीचा म्हणजे संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे. जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम 1 जून रोजी प्रसिद्ध झाला असून पहिल्या दिवसापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकारण्यास सुरुवात झाली होते.

या निवडणुकीत संचालकपदासाठी शुक्रवारपर्यंत एकूण 214 उमेदवारांजे अर्ज दाखल झाले होते. त्यात, मंत्री, आमदार, खासदारांच्या मुलांसह दिग्गजांच्या अर्जाचा समावेश होता. मात्र, या दिग्गजांपैकी दोन दिग्गज नेत्यांचा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार यांचा आणि कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, 8 जुलै रोजी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

700 कोटींची उलाढाल

दरम्यान, 700 कोटींची वार्षिक उलाढाल आणइ जिल्ह्यात बँकेच्या 137 शाखा असलेल्या जिल्हा बँकेच्या तब्बल 3137 कोटींच्या ठेवी आहेत. मागील संचालक मंडळाच्या निवडणुकीत ही बँक शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या रुपाने पहिल्यांदाच काँग्रेसेतर नेतृत्वाकडे गेली.

आता, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा डोळा आता सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आहे. त्यामुळे, कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या बँकेत आता भाजपने ताकद लावली आहे. त्यातच, समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपची डोकेदुखी आणखी कमी झाली आहे.

follow us