मुख्यमंत्री केंद्रात जाणार?…, स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चर्चेला एका वाक्यात दिलं उत्तर

जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ जे दिलयं त्यात मी समाधानी आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

News Photo   2026 07 26T135914.929

मुख्यमंत्री केंद्रात जाणार?..., स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चर्चेला एका वाक्यात दिलं उत्तर

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिला. (Dharmendra) त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. त्यावरुन विविध चर्चा, तर्क-वितर्क सुरु होते. यावर आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. मी मुंबईत आहे, महाराष्ट्रातच राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

मागच्या महिन्याभरापासून देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, तिथे मंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यापासून ही चर्चा जास्त जोरात सुरु झाली. पण आज स्वत: फडणवीस यांनीच स्पष्ट केलं की, ‘मी महाराष्ट्रातच राहणार आहे’ संसदेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याचकाळात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा चर्चा आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असं सतत बोललं जातय. पण मुख्यमंत्र्यांनी स्वत:च महाराष्ट्रात राहणार असल्याचं सांगितलं आहे. काल पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठूरायाची पूजा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘जे दिलंय ते उत्तम आहे, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं’ जे दिलयं त्यात मी समाधानी आहे, याचा पुनरुच्चार करत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

Exit mobile version