फोन हिसकावून घेऊन पाच तास बसून ठेवले, सरकारला मला…. अभिजित दिपकेंचा खळबळजनक आरोप
पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती
बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैदराबादच्या 2026 मध्ये कायद्याची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वकिल म्हणून नोंदणीवर पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांबाबत भारताचे सरन्यायाधीशांनी केलेल्या कथित टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दीक्षांत समारंभातील सहभागाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोहिमेची BCI ने गंभीर दखल घेतली आहे.
या मोहीमेत कोणाचा सहभाग ?
BCI अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी NALSAR च्या कुलगुरूंसह सर्व राज्य बार कौन्सिल्सना पत्र पाठवून 2026 च्या बॅचमधील कोणत्याही विद्यार्थ्याची वकील म्हणून नोंदणी करू नये, असे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या मोहिमेमागे कोण होते, ती कोणी सुरू केली, तिचे समन्वयक कोण होते आणि विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक किंवा बाहेरील व्यक्तींचा यात सहभाग होता का, याबाबत तीन दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश विद्यापीठाला देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मोहिमेची चौकशी
BCI ने NALSAR कडून मोहिमेशी संबंधित निवेदने, याचिका, मेमोरँडम, पत्रव्यवहार आणि त्यावरील स्वाक्षरी करणाऱ्यांची संपूर्ण यादी मागवली आहे. तसेच सोशल मीडिया माध्यमातून मोहीम राबवणारे, बैठका आयोजित करणारे, विद्यार्थ्यांना एकत्र करणारे आणि दीक्षांत समारंभावर बहिष्कार किंवा त्यात सहभागी न होण्याचे आवाहन करणाऱ्यांची माहितीही मागण्यात आली आहे. या प्रकरणात विद्यार्थी संघटना, प्राध्यापक, संशोधक, माजी विद्यार्थी किंवा बाहेरील व्यक्तींचा सहभाग असल्यास त्याचाही तपशील अहवालात देण्यास सांगण्यात आले आहे.
‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भडकवलं’ असा BCI चा आरोप
BCI अध्यक्षांनी काही विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत NALSAR च्या शैक्षणिक कर्मचाऱ्यांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याची किंवा चिथावणी देण्याची भूमिका बजावली असल्याची गंभीर माहिती मिळाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
संसदेत कंगना राणौतचा साधा साडी लूक; पण चर्चेत राहिल्या 56 लाखांच्या लक्झरी अॅक्सेसरीज!
मात्र, केवळ या मोहिमेत सहभागी झाल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला वकील म्हणून नोंदणीसाठी अपात्र ठरवण्यात आलेले नाही, असे BCI ने स्पष्ट केले आहे. चौकशी सुरू असताना नोंदणी केली गेल्यास पुढील कारवाईवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
19 ऑगस्टला अंतिम निर्णयाची शक्यता
NALSAR च्या कुलगुरूंचा अधिकृत अहवाल प्राप्त झाल्यानंतर 19 ऑगस्ट 2026 रोजी या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे BCI च्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
… तोपर्यंत पंतप्रधान मोदींना रात्रीची झोप लागू देणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
त्यामुळे आता NALSAR कडून सादर होणाऱ्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, 2026 च्या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या वकिलीच्या नोंदणीबाबत BCI अंतिम काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
