पवार मोदींना भेटले हेच जंतर-मंतर; सगळ्यांना सडकून काढत राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Raj Thackeray पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्याला काही अर्थच नाही. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहेत
Raj Thackeray : नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशातील वातावरण ढवळून निघालेलं असताना आता ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. येत्या 26 जुलै रोजी मुंबईत शक्ती मोर्चा काढला जाणार असल्याचे उद्धव आणि राज ठाकरेंनी घोषित केले. यावेळी राज ठाकरेंनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलचं सडकून काढलं. झुरळांना जन्माला घालणारे सरन्यायाधीशच आहेत आणि दिल्लीतील लाठीचार्चचे व्हिडिओ बघण्यास वेळ नाही असे म्हणणे कितपत योग्य आहे. यांच्यामुळेच झुरळ सुरू झालं ना, जन्मदाते हेच ना, यांनी जन्म दिल्यानंतर त्यांच्याकडे बघायला नको असे राज ठाकरे म्हणाले.
पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्याला काही अर्थच नाही
नीटचे पेपर तिसऱ्यांदा फुटले. विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधानांनी आज ट्विट केलं, पण त्याला काही अर्थच नाही. या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटत आहेत असे राज म्हणाले.
रविवारी 26 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मोर्चा
26 जुलै रोजी आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढणार आहोत. प्रत्येक घरातील पालकांना हे सर्व बघून खूप त्रास होतोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. येत्या रविवारी 26 जुलै रोजी ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलनही अशाच पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा सत्तेचा उद्दामपणा कशासाठी? कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला? मुद्दा प्रधानांपर्यंत नाही तर पंतप्रधानांपर्यंत गेला आहे.
कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला?
शेतकऱ्यांचं आंदोलनही अशाच पद्धतीने मोडण्याचा प्रयत्न झाला होता. हा सत्तेचा उद्दामपणा कशासाठी? कुणाचंच ऐकत नाहीत, हा माज कसला? मुद्दा प्रधानांपर्यंत नाही तर पंतप्रधानांपर्यंत गेला आहे”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
पवार मोदींना भेटले हेच जंतर मंतर
पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पावर-मोदी भेटीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, पवार मोदींना भेटले यालाच जंतर मंतर म्हणतात असे मिश्लिक प्रतिक्रिया दिली. 26 जुलै रोजी मोर्चात असं कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर फटकावून काढू. शांततेनं हा मोर्चा होईल. कोणताही गोंधळ नसेल. इथे दिल्लीत केल्यासारखं प्रयत्न झाला तर आमची लोकं सोडणार नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
मोर्च्यात फक्त तिरंगा असेल
येत्या 26 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्च्यामध्ये फक्त तिरंगा असेल, कोणत्याच पक्षाचा झेंडा नसेल, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.आंदोलन घराघरात पोहोचलंय. सरकार आता बॅकफूटवर गेलंय. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे सरकारने ठरवावं. आंदोलन अंगलट आलंय, हे सरकारच्या लक्षात आलंय. आंदोलन अंगलट आल्याने सरकारकडून सारवासारव सुरू असल्याचेही राज म्हणाले.