Bajrang Sonawane On Valmik Karad: बीडच्या विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडवर (Valmik Karad) गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड हा संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात आहे. “विलास घुले प्रकरणात वाल्मिक कराड माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवण्याचा कट रचतोय”, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परीषदेत केला. त्यांनी या संबधीत एक कॉल रेकॉर्डींगही ऐकवली. वाल्मिक कराड जेलमधून या प्रकरणाची सुत्रे हलवतो, असा आरोप सोनवणेंनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर बीड जिल्हा कारागृहाची (Beed Jail) तब्बल सात तास झडती घेण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या पथकाने बीड कारागृहाची झडती घेतली. उपमहानिरीक्षक योगेश देसाईंनी चौकशी करताना अधिकाऱ्यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांना बाजूला ठेवले, अशी माहिती आहे. “वाल्मिक कराड 20 मोबाईल वापरतो. त्याने जेलमधून सुग्रीव कराडला फोन करुन सांगितले की, बजरंग सोनवणेच्या मुलाला विलास घुले प्रकरणात अडकवा, त्याच्यावर गुन्हा दाखल करा”, असा आरोप बजरंग सोनवणेंनी केला होता.
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
त्यामुळे सोनवणेंनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभुमीवर उपमहानिरीक्षक योगेश देसाईंनी स्वतः कैद्यांची चौकशी केली. ही चौकशी व तपासणी जवळपास सात तास चालली. याआधी कारागृहातील गैरप्रकाराबाबत दोन कर्मचाऱ्यांवर नुकतीच कारवाई करण्यात आली होती. आता बजरंग सोनवणेंच्या या आरोपानंतर योगेश देसाईंनी कारागृहाच्या केलेल्या तपासणी आणि चौकशीत काय निष्कर्ष निघतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
