पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे बंधुंच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन, सर्व कुटुंब उपस्थित

राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं.

News Photo   2025 12 24T121837.013

पत्रकार परिषदेपूर्वी ठाकरे बंधुंच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन, सर्व कुटुंब उपस्थित

मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ठाकरे (Thackeray) बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. याआधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे कुटुंबीयांना एकत्र पाहून यावेळी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे डोळे पाणावले. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रही भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

अगोदर बाळासाहेबांना अभिवादन अन् नंतर पत्रकार परिषद, राज्याच लक्ष लागलेल्या युतीची आज घोषणा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र मिळून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करुन जाताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एका चिमुकलीने चाफ्याचं फुल दिलं. तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी एकत्र बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं.

ठाकरे बंधूंची युती कुठं कुठं?

मुंबई
ठाणे
मिरा-भाईंदर
कल्याण-डोंबिवली
नवी मुंबई
नाशिक
पुणे

Exit mobile version