भाजपने उमेदवारी दिली पण मामा सतेज पाटलांचा सल्ला अन् पाठिंबा मिळाला? स्मिता जाधव म्हणाल्या…

BJP Smita Jadhav पुणे पदवीधर मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्याशी लेट्स मराठीने साधलेला खास संवाद

BJP Smita Jadhav Satej Patil

BJP Smita Jadhav Satej Patil

BJP Pune Graduat Constituancy Candidate Smita Jadhav Interview who Niece Congress leader Satej Patil : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत भाजपने पुणे शिक्षक व पदवीधर दोन्ही जागा आपल्याकडे खेचून आणत दोन्ही जागांवर उमेदवार दिलेत. यात पुणे पदवीधरच्या जागेवर भाजपने नवा डाव खेळला आहे. डॉ. स्मिता पाटील-जाधव (Dr.Smita Patil-Jadhav) यांना उमेदवारी देत मोठी राजकीय खेळी केलीय. कारण त्या काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या भाची आहेत. अचानक उमेदवारी मिळालेल्या डॉ. स्मिता पाटील-जाधव यांची लेट्सअप मराठी या निमित्ताने मुलाखत घेतली. यावेळी बोलताना स्मिता यांना मामा सतेज पाटलांना अडचणीत आणण्यासाठी भाजपची उमेदवारी मिळाली आहे का? असा प्रश्न विचारला असता त्या काय म्हणाल्या पाहा…

मामा सतेज पाटलांना अडचणीत आणण्यासाठी भाजपची उमेदवारी?

माझे मामा आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी मा भाजपने उमेदवारी दिली असं मला वाटत नाही. कुटुंब एकत्रच राहिलं पाहिजे असं आमचं धोरण आहे आणि ते राहिलच पाहिजे अच्छा ते महत्त्वाच आहे आपल्या देशासाठी महत्त्वाच आहे आणि आम्ही तसच असणार पण जेव्हा पक्षाची निष्ठा येते त्या पक्षाच्या निष्ठेप्रमाणे आम्ही सगळेजण काम करणार कारण शेवटी समाजासाठीच काम करायच आपल्याला चांगलं काम करायचं उत्तम काम करायचं आणि त्या डायरेक्शननीच मी काम करणार आहे.

‘ज्ञानेश कुमार मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहेत’; अभिजीत दिपकेचे गंभीर आरोप!

असं विचारलं असता त्या म्हणाल्या लहानपणापासून मामाची शिकवण हीच आहे ना चांगलं समाजासाठी काम करायचं ओके आय एम द बेस्ट अच्छा पण जेव्हा मामा आता प्रचार सभेमध्ये उतरतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करा असं म्हणतील तेव्हा कसं वाटेल हा विचार नाही केला जेव्हा बघू मी प्रश्न येईल तेव्हा बघू ओके मग मामासाठी काही उत्तरं तयार ठेवलेले आहेत का? नाही नाही असं काय ते मामा आहेत शेवटी ते पण राजकारणामध्ये असं म्हणतात की ऑल फेर इन लॉर तस ते पुढच जे शब्द आहे तो देखील पॉलिटिक्स आहे समाजासाठी आपल्याला चांगलं काम करायचं पक्षाला निष्ठा ठेवायची या दोन्ही डायरेक्शन्सनी जे निर्णय होतील आणि जो पक्ष निर्णय घेईल त्या दृष्टीनेच मी काम करणार.

देशात पहिल्यांदाच ‘खुशी विभाग’ सुरू होणार? लोकांच्या हॅप्पीनेसवर मोजली जाणार प्रगती…

जर माझी ही सीट निवडून आली तर सोलुशनवर मी नक्कीच काम करणार आहे. लोक मला विश्वासाने वोट्स देतायत जनसंपर्क हा त्यातला मुख्य भाग आहे. तर 100% लोकांना भेटणं त्यांच्या प्रॉब्लेम सोडवणं त्यांचे फोन्स घेण हे माझं कर्तव्य आहे. तर नक्कीच त्या कार्यासाठी ट्रान्सपरन्स अकाउंटेबिलिटी हे ठेवणं हे माझं पहिलं काम राहील ओके आणि मी अवेलेबल राहणार आहे. हे एक जबाबदारी घेतली तर जबाबदारी पूर्ण 100% पार पडणं ही माझी लहानपणाला अशी शिकवणच आहे जी माझ्या वडिलांनी दिली आहे.

 

Exit mobile version