देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Delimitation Bill : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

News Photo   2026 11 27T145351.336

Delimitation Bill

Delimitation Bill : देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक संसदेच्या दोन्ही (Bill) सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकावर चर्चा आणि पुढील कार्यवाहीसाठी 30 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

यामध्ये विविध राज्यांमधील जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यांमध्ये जागांच्या वाटपाची सध्याची व्यवस्था पुढील 25 वर्षांपर्यंत, म्हणजेच 2051 सालापर्यंत, कायम राहील. याच पार्श्वभूमीवरती केंद्र सरकार आणत असलेल्या डिलिमिटेशन बिलाला पाठींबा मिळावा यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासोबत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचा संपर्क केला असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत हे बिल आणले जात आहे, त्यावेळेस सर्व सहकार्य मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? बहुतांश जिल्हाध्यक्षांचा कल विधेयकाच्या बाजूने

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या नेत्यांसोबत संवाद करून शंका दूर करण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.दिल्ली पातळीवर आणि राज्य सरकारच्या पातळीवरती घडामोडींना वेग आला आहे, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना संपर्क केला असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाशी आता भाजपचे वरिष्ठ नेते संपर्क साधत आहेत.

याआधी देखील संपर्क करण्यात आला होता, हे विधेयक पास व्हावं यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर हे विधेयक पास करताना कोणकोणते पक्ष पाठिंबा देऊ शकतात त्यांना संपर्क केला जात आहे, तर या विधेयकाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्याला पाठिंबा देण्याबाबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.

Exit mobile version